lok-sabha-election-2024-akola : लोकसभा निवडणुक तयारीला वेग; अकोला जिल्हा व पोलीस प्रशासन सज्ज




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला, दि. 11 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या तयारीला वेग आला असून, अकोला जिल्हा व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत.




लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी सुसज्ज राहण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.




निवडणुकीसाठी यंत्रणांच्या पूर्वतयारीचा आढावा त्यांनी लोकशाही सभागृहात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. ‘स्वीप’ समितीच्या नोडल अधिकारी तथा जि. प. सीईओ बी. वैष्णवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी कक्षाचे नोडल अधिकारी रामदास सिद्धभट्टी, निवडणूक साहित्य समितीचे नोडल अधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.


जिल्हाधिका-यांनी निवडणूक व्यवस्थापन आराखडा, मतदान केंद्र, केंद्रांवर आवश्यक सुविधांचा आढावा, ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना द्यावयाच्या सुविधा, विविध तक्रारींबाबत तातडीने निपटारा करण्यासाठीची कार्यवाही, मतदान केंद्रातील व्यवस्थापन, रूट मॅप, क्षेत्र नकाशा, संप्रेषण योजना , मतदान कक्षात मतदार सहाय्यकांच्या नियुक्ती, वाहन व्यवस्था याबाबत सविस्तर आढावा घेतला. 


ते म्हणाले की, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच नोडल अधिका-यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे. वेळोवेळी निर्गमित होणा-या सूचना, निर्देश सर्व ठिकाणी प्रत्येक कर्मचा-यापर्यंत पोहोचतात किंवा कसे, याची खातरजमा करावी. कुठेही त्रुटी, अडचण उद्भवणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.




 


‘स्वीप’ कार्यक्रमाची भरीव प्रसिद्धी करावी. ‘रँडमायझेशन’, राजकीय पक्षांना सूचना देणे, कंट्रोलरूम, मीडिया सेंटर आदी बाबी सुसज्ज कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.






आगामी लोकसभा निवडणुक शांततेने पार पाडण्यासाठी सीमा सुरक्षा दलाची कंपनी अकोल्यात दाखल झाले आहेत.




आगामी लोकसभा निवडणुक सन २०२४ चे पार्श्वभुमीवर निवडणुका शांततेने व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात म्हणुन केंद्र शासनाकडुन अकोला जिल्हयात सीमा सुरक्षा दलाची ०१ कंपनी ४५० ॲडहॉक बटालीयन पुरविण्यात आली आहे. त्यादृष्टीने ०८ मार्च रोजी विजय हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय येथे  बच्चन सिंह पोलीस अधीक्षक अकोला यांनी सीमा सुरक्षा दलाचे कपंनीचे अधिकारी व जवान यांची बैठक आयोजीत केली. सदर कंपनीचे नेतृत्व सहायक समादेशक विकास चंद्रा करीत असुन कंपनीत अधिका-यासह ७१ जवानांचा समावेश असुन आगामी काळात आणखी जवान दाखल होणार आहेत.




पोलीस अधीक्षक यांनी अकोला लोकसभा निवडणुक संबंधाने लोकसभा मतदार संघातील भौगोलिक, सामाजिक, राजकिय, कायदा व सुव्यवस्था इत्यादी बाबीबर मार्गदर्शन केले. निवडणुक प्रक्रीया सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली. आगामी काळात जिल्हयातील महत्वाचे ठिकाणी सीमा सुरक्षा बलाकडुन रूट मार्च, फ्लॅग मार्च चे प्रदर्शन करून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक शांततेने व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरीता विशेष भर दिला जाईल, असे मत व्यक्त केले. आलेल्या सर्व सिमा सुरक्षा दलाचे अकोला जिल्हयात स्वागत केले. आपले विशेष सहकार्यातुन निवडणुक शांतातेच पार पडेल, असा आशावाद व्यक्त केला.


टिप्पण्या