lok-sabha-election-2024-akl: महाविकास आघाडीच्या गाडीत कुणीही बसायला तयार नाहीत - ना. चंद्रकांत पाटील





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाविकास आघाडीच्या गाडीत कुणीही बसायला तयार नसून, या गाडीचा चालक कोण असा प्रश्न लोकांना उपस्थित झाला आहे, अशी खोचक टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटिल यांनी केली. 



ना. पाटिल यांचे गुरुवारी अकोल्यात आगमन झाले.यावेळी ते बोलत होते.


अकोल्यात भाजप तर्फे लोकसभेच्या अनुषंगाने बैठकांना सुरुवात करण्यात आली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींना सल्ला दिला तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर सुध्दा टीका केली. तर पाटील यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर टीका करत यावेळी राहुल गांधींना सल्ला ही दिला.

लोकसभेची सुरुवात होत असून राहुल गांधी यांनी उमेदवार निवडीकडे लक्ष दिले पाहिजे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आज अकोल्यात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यात विविध पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी मुस्लिम महिलांनी मोठ्या संख्येने भाजप मध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी काँग्रेस वरही जोरदार टीका केली.



ना. चंद्रकांत पाटील यांचे उपस्थित वंचित व उबाठा सेनेचे कार्यकर्ते सहित २ हजार कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश 



अनुप धोत्रे यांचे उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर युवा शक्तीची पहिली पसंद महायुती 




गेल्या १० वर्षामध्ये  सर्व सामन्यांच्या अशा – आकांक्षा, जात – पात धर्मा पेक्षा गरीब याला केंद्र बिंदू मानून गरीब, शेतकरी, सर्व सामान्य युवा आणि मातृशक्ती यांचा विकास करण्याचा संकल्प घेऊन सर्व क्षेत्राचा विकासासोबत पायाभूत योजना निर्माण करून विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्प घेऊन पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांचेवर सर्व जाती धर्माचा विश्वास असून या देशाचा  विकास भाजपच महायुती करू शकते त्यामुळे जनता जनार्दन भारतीय जनता पक्षाच्या महायुती व नरेंद्र मोदी यांचेवर प्रेम असल्याने ४०० के  पार NDA सरकार परत सत्तेत येणार असून युवा नेतृत्व अनुप धोत्रे यांच्या उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर दलित, मुस्लीम, मागासवर्गीय व समाजातील सर्व घटकांचा मातृशक्तीचा प्रवेश ही प्रचंड विजयाची नांदी असल्याचे प्रतिपादन भाजपा माजी प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रकांत  पाटील यांनी केले.



स्थानिक स्व. नामदेवराव पोहरे सभाग्रून मराठा मंडळ कार्यालय येथे २ हजार पेक्षा जास्त विविध पक्षाचे कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश करून पंतप्रधान ना नरेंद्र मोदी, देवेंद्र  फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे व अकोला जिल्हा भाजपा नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून प्रवेश  कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील हे होते तर मंचावर आ रणधीर सावरकर, आ प्रकाश भारसाकळे, तेजराव थोरात, जयंत मसने, विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, बळीराम शिरास्कर  कृष्णा शर्मा, राधा तिवारी, सुलभा सोळके, चंदा शर्मा, अर्चना मसने, तस्लीमा बोरींगवाले,  वैशाली शेळके, आम्रपाली उपर्वट, संतोष शिवरकर, माधव मानकर, रमेश अलकरी देवाशिष काकड, सुमन गावंडे, वैशाली शेळके, चंद्रशेखर पांडे , संजय गोटफोडे, पवन महल्ले, देवेंद्र देवर, राजेश बेले, राजेश रावणकर, संजय इंगळे, संतोष पांडे, निलेश निनोरे, रमेश करिहार, अंबादास घेंगे, गजानन उंबरकार, गणेश अंधारे, सचिन देशमुख, प्रवीण दिक्कर,  डॉ शंकरराव वाकोडे, अंबादास उमाळे, संदीप गावंडे आदी मंचावर विराजमान होते.





या वेळी ५० मुस्लीम महिला यांनी भाजपामध्ये प्रवेश करून भाजपा वर विश्वास व्यक्त केला तसेच सुलभ सोळंके यांचे नेतृत्वात २०० आदिवासी महिला तसेच माजी  जिल्हा परिषद सदस्य, उबठा सेनेचे सुरेश गोरे, वंचित आघाडीचे ज्ञानेश्वर भगत तसेच अकोला शहर, बार्शीटाकळी, अकोट , तेल्हारा अकोला पूर्व या मतदार संघातील विविध सामाजी क कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यांचा ना चंद्रकांत दादा पाटील व मंचावरील नेत्यांनी भाजपाचा दुपट्टा देऊन स्वागत केले.  या वेळी आमदार प्रकाश भारसाकळे, यांचे समयोचित भाषण झाले.  




भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी  महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी केंद्र व राज्य नेतृतावर तसेच महायुतीच्या सर्व नेत्यांचे आभार व्यक्त केले व आंपण मतदारांचा विश्वास सार्थ करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात सुजलाम सुफलाम अकोला लोकसभा मतदार संघ करण्यासाठी कार्यरत राहू असा विश्वस ब्याक्त केला. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस आ रणधीर सावरकर यांनी सनातन संस्कृती व विकास कामे करतांना कोणता ही भेदभाव नाही हे विकासाचे सूत्र घेऊन राज राजेश्वर मंदिराचा विकासासोबत जिल्ह्यातील धार्मिक सामाजिक, भौगोलिक, आर्थिक विकासासाठी खा. संजय धोत्रे व स्व. भाऊसाहेब फुंडकर स्व गोवर्धन शर्मा, स्व.मोतीरामजी लहाने, स्व. शंकरराव राजनकर, स्व. वसंतराव देशमुख, स्व. डॉ प्रमिलाताई टोपले, स्व. विठ्ठलराव सल्पिकार, स्व. शंकरलाल खंडेलवाल सारख्या सर्व जेष्ठ नेत्यांची स्वप्न पुरती व युवा आकांक्षा व मातृशाक्तींच्या भावना चा विचार करून अकोला जिल्ह्याचे विकासासाठी,  भाजपा प्रदेश नेतृत्व देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष बावनकुळे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांचा विश्वास व मतदारांचा आशीर्वाद अनुप धोत्रे सार्थ करून अकोला लोकसभे मध्ये विजयी होणारच असा  विश्वास व्यक्त केला . कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय अग्रवाल यांनी केले.



नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी ना. पाटील यांच्या हस्ते मतपेटीचा शुभारंभ 






विकसित भारत व महाशाली राष्ट्र निर्माणासाठी सर्वांचे मत जाणून घेण्यासाठी पंतप्रधान ना  नरेंद्र मोदी यांनी संकल्प घोषणा पत्रामध्ये सर्व सामान्याच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी देशातील एकमेव पार्टी असून सन २०१४,२०१९ आणि आता २०२४ मध्ये मते जाणून घेऊन कार्य करत असल्यामुळे विकासाचे मानबिंदू व विकास व विश्वासाची ग्यारंटी नरेंद्र मोदी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना चंद्रकांत पाटील यांनी केले. 



अकोला लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपब्लिकन पार्टी व महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या घोषणा पत्रामध्ये स्थानिक, राज्य व देश पातळीवर योजना संबंधी नागरिकांचे प्रत्येक विधानसभे मध्ये २० हजार पेक्षा जास्त नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी मतपेटी ठेवण्यात येत असून त्या पेटीचा शुभारंभ जनतेसाठी उपलब्ध करून देण्याचे कार्यक्रमात ते बोलत होते. 



स्थानिक जयहिंद चौक, शिवाजी पार्क, भाजपा कार्यालय व जिल्ह्यात २०० ठिकाणी मतपेटी ठेवण्यात येत असून ना चंद्रकांत पाटील यांचे वतीने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 






कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विजय अग्रवाल होते तर प्रमुख अतिथी आ. रणधीर सावरकर, अनुप धोत्रे, आ. आकाश फुंडकर, किशोर पाटील, जयंत मसने, निलेश निनोरे, रमेश करिहार, संतोष पांडे, दिलीप मिश्रा,गिरीश  जोशी,देवाशिष काकड, सुमनताई गावंडे, चंद्रशेखर पांडे गुरुजी, माधव मानकर, पवन महल्ले, राजेंद्र giri, संजय गोटफोडे, नायसे, सतीश ढगे, राहुल देशमुख, सारिका जैस्वाल, शाम विंचनकर, संदीप गावंडे, गणेश अंधारे, अनिल गरड, आरती घोगलिया, चंदा शर्मा,  कृष्णा शर्मा, तेजराव थोरात, अर्चना  चौधरी, सिद्धार्थ शर्मा, तुषार भिरड, साठे, शर्मा, विलास शेळके, वैशाली शेळके आदी प्रमुख्याने उपस्थित होते.

 


यावेळी अनुप धोत्रे यांनी नरेंद्र मोदी  यांची विकासाची ग्यारंटी व देवंद्र फडणवीस यांचा विकासाचा संकल्प व महायुती तील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व अजित पवार यांची साथ, स्व. भाऊसाहेब फुंडकर, मोतीरामजी लहाने, गोवर्धन शर्मा, शंकरराव राजनकर, स्व. तिडके, स्व. आंधळे, वसंतराव देशमुख, स्व. मानकर,  स्व अण्णासाहेब मुंडगावकर, शंकरराव खंडेलवाल, सारख्या जेष्ठांच्या त्याग व तपस्या व त्यांनी दाखविलेल्या मार्गदर्शनात खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे, आ. वसंत खंडेलवाल व जिल्ह्यातील पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख महायुतीतील शिवसैनिक व संघ परिवारातील सर्व जेष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी व राष्ट्रभक्त पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांना मानणारा वर्ग यांच्या बळावर अकोला लोकसभा मतदार संघात सातव्यांदा महायुतीचा झेंडा फडकविणार असा  विश्वास व्यक्त केला. 


यावेळी आमदार सावरकर यांनी भारतीय जाता पक्ष व महायुतीचा कार्यकर्ता हा हनुमान असून  कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवून विदर्भ सर्वात जास्त मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला. यावेळी खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंत मसने, संचालन विजय अग्रवाल तर आभार प्रदर्शन रमेश अलकरी यांनी केले.



चंद्रकांत पाटील यांनी घेतले श्री राजराजेश्वराचे दर्शन


उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अकोला येथील ग्रामदैवत श्री राजराजेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.

आमदार रणधीर सावरकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री श्री. पाटील यांनी श्री राजराजेश्वराला जल वाहून अभिषेक केला. मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे श्री राजराजेश्वराचे छायाचित्र, शाल व श्रीफळ देऊन मंत्री श्री. पाटील यांचा गौरव करण्यात आला. श्री. पाटील यांनी यावेळी  व्यवस्थापन व अधिका-यांशी चर्चा करून मंदिराच्या विकास आराखड्याबाबत व नियोजित कामांबाबत यावेळी माहिती घेतली. 


 


   




     

 

टिप्पण्या