India-Lok-Sabha-election-2024: भारत लोकशाहीच्या उत्सवासाठी सज्ज; महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया

image courtesy: ECI



भारतीय अलंकार न्यूज 24

नवी दिल्ली: 97 कोटी मतदार, 1.5 कोटी मतदान अधिकारी आणि 10.5 लाख मतदान केंद्रांसह भारत लोकशाहीच्या उत्सवासाठी सज्ज झाला आहे. 55 लाखांहून अधिक ईव्हीएम तैनात केले जाणार आहेत. महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. तर संपूर्ण लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. 





महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात 

निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे.




पहिला टप्पा - मतदान तारीख - 19 एप्रिल 

महाराष्ट्र - रामटेक, नागपूर, भंडारा, गरचिरोली, चंद्रपूर


दुसरा टप्पा - मतदान तारीख - 26 एप्रिल 

महाराष्ट्र - बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी


तिसरा टप्पा - मतदान तारीख - 7 मे 

महाराष्ट्र - रायगड, बारामती, उस्मानबाद, लातूर, सोलापर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, हातकणंगले


चौथा टप्पा - मतदान तारीख - 13 मे 

महाराष्ट्र - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड


पाचवा टप्पा - मतदान तारीख - 20 मे

महाराष्ट्र - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतल्या 6 जागा


टिप्पण्या