Harihar-devotees-played-Holi: मोठया राम मंदिरात हरीहर भक्तांनी नैसर्गिक रंग आणि फुलांनी खेळली होळी




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला पंचक्रोशीत अकोला पुष्करणा चेतना समिती, श्रीराम हरिहर संस्था तसेच श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था, राधाकृपा सत्संग मंडळ तसेच सुप्रभात सत्संग मंडळ यांच्या वतीने रविवारी हरीहर अर्थात भगवान श्रीविष्णू आणि भगवान शिव भक्तांनी एकत्र येवून फुलांची आणि नैसर्गिक रंगाची होळी खेळली.  






मथुरा, वृंदावन, अयोध्येच्या धरतीवर संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र मोठ्या राम मंदिरात यंदाही शेकडो भक्तांच्या व मातृ शक्तीच्या साक्षीने भगवान श्रीकृष्ण यांच्यासमोर आनंद आणि भक्ती वातावरणात भक्तांनी होळी खेळण्याचा आनंद घेतला.


हा कार्यक्रम अकोल्याच्या इतिहासात संस्कृती आणि धर्मअध्यात्मला बल देणारा असून, माजी नगरसेवक तथा भाजपा प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांच्या संकल्पनेतून पुढे शहरात सातत्याने 28 वर्षापासून हा कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत असतो.




 

गेल्या पंधरा वर्षापासून मोठ्या राम मंदिरात मोठ्या उत्साहाने समाजातील सर्व भेद  विसरून सामाजिक समरसताचा हा उत्सव साजरा करण्यात येतो. 



आरंभी मंदिराच्या अध्यक्ष सुमन अग्रवाल यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या प्रतिमेचे मूर्तीचे पूजन वेदपाठी ब्राह्मणांच्या मंत्रोच्चाराने करण्यात आले. कार्यक्रमात राधा कृपा सत्संग मंडळच्या तीन पिढीच्या सदस्यांनी भक्ती गायन करून भक्तांना होलिका रसिया आनंद दिला. 

श्री जानकी वल्लभो धर्मास संस्थेचे धर्माचार्य अध्यक्ष अनिल मानधने, कविता मानधने यांनी उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी गिरीश जोशी, सुनिता जोशी,अनिल थानवी, ॲड. महेंद्र पुरोहित, अमरचंद जोशी, विनायक शांडिल्य गुरुजी यांनी पूजा अर्चना केली. खामगाव येथून तुळशी भजन मंडळाचे लीलाधर पुरोहित, शेगाव येथुन विजय व्यास हे सुद्धा आले होते. 




होळीचे विविध हिंदी मराठी भजन महादेव वानरे, जुगल जोशी,  गिरीश जोशी, दिनेश जोशी, सुरेश व्यास, महेश वासू, महेश जोशी, विजय जोशी, कृष्णा बोरा, शक्ती पुरोहित, गिरीराज पुरोहित , विरेंद्र व्यास, सौरभ संघानी,  हर्ष पुरोहित, अजय जोशी,  ओमप्रकाश जाजू, ओमप्रकाश बाच्छुका, गोपीचंद गुप्ता, हुकमीचंद गुप्ता, शंकर खोवाल,  योगेश शाहू, सिद्धार्थ शर्मा, महेश बगरेट, गिरीराज तिवारी, हितेश चौधरी, हरित चौधरी, पवन चौधरी, हिम्मत चौधरी, रुपेश यादव, पूनम खत्री, संगीता शर्मा, प्रिया शाहू,  अनिशा भाटिया, कविता मांडले, फुलचंद पटवारी, तुषार पुरोहित, प्रेम छगानी, जयश्री छगानी, दिनेश जोशी, ज्योती पुरोहित, शीला मुंदडा, शोभा लतुरिया, हेमा जोशी, माधुरी राठी, रेखा चांडक, अहिल्या अग्रवाल, हेमंत आढाव, पुष्पा वानखडे, मनीषा भुसारी,  प्रेमरतन पुरोहित, निर्मला अग्रवाल, तेजस जैन, प्रीती जैन, हरी जोशी, संगीता पाटील, अलका देशमुख सह मोठ्या संख्येने भक्तजन उपस्थित होते.




सतत तीन तास वेगवेगळ्या भजनाने ईश्वरासमोर भक्ती आणि श्रद्धा सोबत मानवतेचे कार्य त्याला प्रेरणादायी श्री जानकी वल्लभो धर्मात संस्थाच्या वतीने हा कार्यक्रम रंगतदार झाला. 

यावेळी पुष्पवृष्टी सोबत श्री रामदेव बाबा श्याम बाबाचे उपाध्यक्ष कमल किशोर अग्रवाल तसेच विविध कार्यकर्ते कार्यक्रमात सहभागी झाले होते. यंदा श्याम बाबा भक्त सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊन या कार्यक्रमाला विस्तार देण्याचा निर्णय सुद्धा करण्यात आला आहे.

टिप्पण्या