encroachment-padsingi-road; पाडसिंगी ते पांगरताटी रस्त्यावर अतिक्रमण; विभागीय आयुक्तांकडे तक्रार




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पाडसींगी ते पांंगरताटी रस्त्यावर गावातील काही लोकांनी पक्के अतिक्रमण केले असून गावकऱ्यांना याचा नाहक त्रास होत असल्याची माहिती सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत तक्रारकर्ते राहुल गवई आणि प्रेमदास पवार यांनी दिली.




राहुल गवई यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमचे कलम 14 अन्वये जिल्हाधिकारी अकोला यांचेकडे आक्षेप अर्ज सादर केला होता. यानंतर जिल्हाधिकारी यांनी हा अर्ज खारीज करण्याचा आदेश दिला होता. जिल्हाधिकारी यांनी अतिक्रमणाबाबत पाडसींगी, तालुका पातूर ग्रामपंचायत सचिव यांना अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले होते.त्यावरून सचिव, ग्रामपंचायत पाडसिंगी, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांनी अतिक्रमणाबाबत मोघम स्वरूपाचा अहवाल विद्यमान न्यायालयासमोर दाखल केला, यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून, जिल्हाधिकारी यांनी आम्हाला न्याय न दिल्याने आता विभागिय आयुक्त अमरावती यांच्या कडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. विभागिय आयुक्तांनी आमच्या तक्रारीचे निवारण करून गावकऱ्यांना न्याय मिळवून दयावा, असे निवेदन देण्यात आले असल्याची माहिती दिनांक 15 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत तक्रारदार राहुल गवई व प्रेमदास पवार यांनी दिली. 


व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रकार परिषदेचा video


या प्रकरणाबाबत गजानन सरकटे यांनी प्रसार माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.

टिप्पण्या