भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या ट्रेड युनियनच्या वतीने शनिवार 23 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण निधी भवन सिव्हिल लाईन अकोला येथे सकाळी 11 वाजता कर्मचारी प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून सामाजिक नेत्या व विचारवंत प्रा. अंजली आंबेडकर मार्गदर्शन करतील. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे राहतील. कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष पी.जे. वानखेडे यांच्या हस्ते होणार आहे.
प्रबोधन मेळाव्यात भारतीय संविधानाची वर्तमान स्थिती व आव्हाने ( Current Status and Challenges of Indian Constitution) तसेच खाजगीकरण तथा बेरोजगारांच्या समस्या व त्यावरील उपाय (Problems of privatization and unemployment and their solutions) या दोन विषयांवर विचारमंथन होईल.
याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटन सचिव प्रा. डॉ. टी. डी. कोसे, राष्ट्रीय महासचिव पी.एच. गवई, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. डॉ. चरणदास सोळंके, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा. शेषराव रोकडे, राज्याचे महासचिव प्रा. डॉ. रविकांत महींदकर, महाराष्ट्र राज्याचे सचिव सिद्धार्थ सुमन, राज्याचे संघटन सचिव सिद्धार्थ डोईफोडे, राज्याचे उपाध्यक्ष चैनदास भालाधरे, राज्याचे कोषाध्यक्ष प्रा. अशोक ठवळे खामगांव जिल्हा बुलढाणा येथील प्रा. डॉ. राजकुमार सोनेकर, या कार्यक्रम समितीचे आयोजक बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव नरेश मुर्ती, अकोला जिल्हा बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे संघटन सचिव सुधाकर वासे इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहतील.
मेळाव्याला अकोला येथील संविधान प्रेमी जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत केले आहे.
पत्रकार परिषदेला बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय महासचिव पी.एच.गवई (बुलढाणा), महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा.शेषराव रोकडे (नागपूर), राज्याचे सचिव सिद्धार्थ सुमन (भद्रावती), राज्याचे उपाध्यक्ष चैनदास भालाधरे, राज्याचे सहसचिव नरेश मुर्ती (अकोला), राज्याचे संघटन सचिव सिद्धार्थ डोईफोडे, राज्याचे कोषाध्यक्ष प्रा अशोक ठवळे, अकोला जिल्ह्याचे संघटन सचिव सुधाकर वासे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा