- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : बाजारात मिळणाऱ्या भेसळ आणि रासायनिक रंगांमुळे रंगउत्सवाच महत्व दिवसेंदिवस कमी होत आहे. या रासायनिक रंगांपासून बचाव करण्यासाठी अकोल्यातील राजस्थानी समाजातील महिलांनी शोधून काढला आहे. उपाय म्हणजे सुगंधी फुलांची होळी. रंगांनी नाही. पाण्यानी नाही. तर फुलांची होळी या महिला खेळतात.
फुलांच्या सुगंधी पाकळ्या उधळून आणि होळीच्या पारंपारिक लोक गीतांवर नृत्य करीत आज शनिवारी या महिलांनी" ब्रज की होली " खेळण्याचा आनंद लुटला. अकोल्यातील खंडेलवाल महिला मंडळ 14 पेक्षा अधिक वर्षापासून दरवर्षी फुलांची होळीचे आयोजन करतात. या होळी करिता सुमारे 200 किलो फुलांचा उपयोग करण्यात आला. पर्यावरण पूरक असलेल्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा