- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
bye-election-akola-shiv-sena: अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुक: शिवसेना (उबाठा) तर्फे राजेश मिश्रा यांना उमेदवारी जाहीर !
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला पश्चिम विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे राजेश मिश्रा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
अकोला पश्चिमचे आमदार दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर ही जागा गेल्या काही महिन्यांपसून रिक्त आहे. या ठिकाणी कोणत्याही पक्षाने अद्यापही आपले उमेदवार जाहीर केले नाही. मात्र, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष तर्फे नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केली.
राजेश मिश्रा हे गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेत असून मा. उद्धव ठाकरे यांच्या सोबत एकनिष्ठ आहेत. तसेच १५ वर्षांपासून नगरसेवक आहेत.
भाजप तर्फे या ठिकाणी भाजप महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल किंवा स्वर्गीय गोवर्धन शर्मा यांचे सुपुत्र कृष्णा शर्मा यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. तर प्रसिध्दी प्रमुख गिरीश जोशी यांनी देखील या जागेसाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे. वंचितने सुद्धा अद्याप आपले पत्ते उघडले नाहीत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा