- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणुक सध्या राज्यात राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
काँग्रेस वगळता एकाही पक्षाने अद्यापही आपला उमेदवार जाहीर केला नाही. काँग्रेस तर्फे साजिद खान पठाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र पक्षांतर्गत वादाचा फटका त्यांना बसत आहे.
आज शहरात पक्ष निरीक्षक येत असून काही इच्छुक उमेदवार साजिद खान पठाण यांच्या नावावर आक्षेप घेणार असल्याच्या चर्चा शहरात रंगल्या आहेत. या चर्चा पठाण यांच्या गोटात पसरताच साजिद खान पठाण यांच्या समर्थकांनी त्यांना भेटण्यासाठी स्वराज भवनात एकच गर्दी केली. मात्र साजिद खान पठाण यांनी एबी फॉर्म केवळ आपल्यालाच मिळाला असून, 28 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करू असे सांगत, इन कॅमेरा बोलण्यासही नकार दिला.
तर दुसरीकडे इच्छुक उमेदवार आणि त्यांचे पाठीराखे स्वराज भवनात दाखल झाले. एकंदरीत आज अनेक दिवसानंतर स्वराज भवन परिसरात काँगेसपक्षियांची थोडी फार गर्दी दिसून आली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा