Bahujan-employees-federation: संविधान रुजविण्यासाठी बहुजन कर्मचारी वर्गाने एकत्र येण्याची गरज - प्रा. अंजली आंबेडकर

 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: सर्व जाती-जमातीतील बहुजन कर्मचारी वर्ग हा आज देशभर सर्वत्र विखुरलेला असून, तो एक संघ नाही नसल्यामुळे आज देशात संविधानाच्या संदर्भात मोठी अराजकता निर्माण झाली आहे. ही अराजकता संपवण्यासाठी बहुजन कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन त्याचा प्रतिकार करणे आता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा.अंजली आंबेडकर यांनी केले.





सिव्हिल लाइन रस्त्यावरील जिल्हा परिषद कर्मचारी भवनात शनिवारी बहुजन एम्प्लाईज फेडरेशन ऑफ इंडियाचा कर्मचारी प्रबोधन मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात मार्गदर्शक म्हणून प्रा.अंजली आंबेडकर या उपस्थित होत्या.




फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या सोहळ्यात स्वागताध्यक्ष म्हणून फेडरेशनचे संघटन सचिव सुधाकर वासें, उद्घाटक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे, वक्ते फेडरेशनचे संघटन सचिव प्रा. डॉ. डी. टी. कोसे तथा प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव पी. एच. गवई, सिद्धार्थ डोईफोडे, फेडरेशनचे सचिव नरेश मूर्ती, प्रदेशाध्यक्ष प्रा. शेषराव रोकडे, सिद्धार्थ सुमन, प्रा अशोक ठवळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 



छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमा पूजन व मान्यवरांच्या स्वागताने या सोहळ्याचा प्रारंभ झाला. यावेळी भारतीय संविधानाची वर्तमान स्थिती व आव्हाने या विषयावर वक्ते प्रा डॉ. डी. टी. कोसे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्याचप्रमाणे खाजगीकरण, बेरोजगार आणि कर्मचाऱ्यांचा समस्या यावर सिद्धार्थ सुमन यांनी मार्गदर्शन करीत या विषयावर आपले विचार व्यक्त केले. मान्यवरांनी कर्मचारी प्रबोधन मिळावे हे कर्मचाऱ्यांच्या सामाजिक विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन करून कर्मचाऱ्यांच्या समस्या खाजगीकरण व बेरोजगारी नाहीशी करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

या एक दिवशीय कर्मचारी प्रबोधन मेळाव्यात अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करीत मेळाव्याची उपयुक्तता प्रतिपादित केली. 



कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष शेषराव रोकडे यांनी केले. संचालन सिद्धार्थ डोईफोडे यांनी तर आभार फेडरेशनचे सचिव नरेश मूर्ती यांनी मानले. या एक दिवशीय प्रबोधन मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी फेडरेशनचे अविनाश वासनीक, पुरुषोत्तम इंगळे, संजय पडघामोल, ॲड. सी. ए. दंदी, ॲड. बि आर वाकोडे, राम शेजव, अजय मोटघरे, विजय ठोंबरे, डी.जे. वानखडे समवेत बएफेची जिल्हा व शहर कार्यकारणी आणि पदाधिकारी यांनी परिश्रम केले.

टिप्पण्या