भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुढील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांतील उमेदवार राजा वेणू गोपाल नाईक आणि साजिद खान पठाण यांच्या उमेदवारीच्या प्रस्तावांना गुरुवारी मंजुरी दिली आहे.
कर्नाटक 36 शोरापूर (एस.टी) मतदार संघाकरिता राजा वेणुगोपाल नाईक व
महाराष्ट्र 30 अकोला पश्चिम मतदार संघाकरिता साजिद खान पठाण हे उमेदवार निवडले आहेत.
के. सी.वेणुगोपाल काँगेस महासचिव यांनी 21 मार्च 2024 रोजी उमेदवारांची नावे एका प्रसिध्दी पत्रकान्वये घोषित केले आहेत.
देशभरातील 26 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात तब्बल 29 वर्षे भाजपचा झेंडा फडकावणारे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्त झाली होती. गोवर्धन शर्मा यांचे 3 नोव्हेंबर 2023 ला निधन झाल्याने अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली. लोकसभा अथवा विधानसभेची मुदत संपण्यास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी असल्यास पोटनिवडणूक कायद्याने बंधनकारक आहे. 2019 मध्ये ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक झाली होती.आता 26 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभेचा कालावधी संपुष्टात येत आहे.
साजीद खान पठाण हे काँग्रेसमध्ये दोन दशकांहून अधिक काळापासून सक्रीय आहेत. अकोला महानगर पालिका मध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून कारकीर्द गाजविली आहे. तसेच ते अकोला काँगेस कमिटी उपाध्यक्ष आहेत.
आघाडीत बिघाडी!
अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवणुकीसाठी काँग्रेस तर्फे साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.साजिद खान पठाण हे काँग्रेसचे नगरसेवक आहे. पक्षाने त्यांना आमदारकी साठी ही दुसरी संधी दिली. 2019 मध्ये भाजपचे दिवंगत गोवर्धन शर्मा यांच्या विरोध साजिद खान पठाण यांनी निवडणूक लढली होती.या निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत साजिद खान पठाण यांचा 2349 मतांनी पराभव झाला होता. तर आजच काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या उ.बा.ठा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी राजेश मिश्रा यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी देखील आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. मात्र भाजपने अद्यापही आपला उमेदवार जाहीर केला नाही. काँग्रेस आणि उ. बा.ठा शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केल्याने अकोल्यात आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हं आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा