- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
akola-west-asse-by-election: अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा दावा; राजेश मिश्रा यांना उमेदवारी - आमदार नितिन देशमुख
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
काँग्रेस सतत पराभूत होणाऱ्या मतदार संघात सेना पहिल्यांदा मोठया फरकाने विजयी होईल- नितिन देशमुख
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात लोकसभा निवडणुकी सोबत मतदान होत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला अकोला लोकसभा उमेदवारी मिळाली असल्याने अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघावर शिवसेनेचा दावा असून, यासाठी एक निष्ठावान कुटुंबं असलेल्या राजेश मिश्रा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
या जागेवर काँग्रेस सतत पराभूत होत आहे. आता या मतदार संघात सेना पहिल्यांदा मोठया फरकाने विजयी होईल, असा दावा शिवसेना(उबाठा) आमदार तथा जिल्हाध्यक्ष नीतीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.
हरीहर पेठ येथे शिवसेना आढावा बैठक घेण्यात आली. तत्पूर्वी याच ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी आमदार देशमुख यांनी अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक साठी राजेश मिश्रा यांची उमेदवारी जाहीर करून, शिवसेना कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढणार,असा विश्वास व्यक्त केला.
राजेश मिश्रा कुटुंबाने शहरात घडलेल्या दंगलीत नागरिकांना संरक्षण दिले आहे जनतेच्या हिताचे कार्य केले. महानगर पालिकेने स्वाती कंपनीला दिलेल्या कंत्राट विरोधात पहिल्यांदा राजेश मिश्रा यांनी आवाज उठविला. त्यामुळे मराठी आवाज विधानसभेत जाणार आहे. या जागेवर काँग्रेस सतत पराजित झालेली असल्याने काँग्रेसने या जागेवर दावा करू नये. कारण वर लोकसभा कॉग्रेसला आणि खाली विधानसभा शिवसेनेला असल्याने छान मेळ बसला आहे. अकोला पश्चिम विधानसभा पोट निवडणुकीत ही जागा शिवसेनेला देणे बंधनकारक आहे. भाजपने या मतदारसंघात केवळ दंगल घडविण्याचे काम केले. विकास केलाच नाही,असा आरोप नितिन देशमुख यांनी करीत, आता विकासासाठी जनता राजेश मिश्रा यांना ५० ते ६० हजार मताधिक्याने विजयी करणार असल्याचा दावा केला.
यावेळी राजेश मिश्रा, अतुल पवनीकर, राहुल कराळे, गोपाल दातकर, तरुण बगेरे, गजानन बोराळे, गजानन चव्हाण, मंजुषा शेळके, तसेच शिवसेना जिल्हा व महानगर कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.
Akola
Assembly
by-election
Govardhan Sharma
Nitin Deshmukh
rajesh mishra
Shivsena
uddhav Thakre
West
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा