Akola-police-election-2024: निवडणुक पूर्व हद्दपारीचे सत्र सुरु; अकोला जिल्हयातील पाच सराईत गुन्हेगार हद्दपार

file image 




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 तसेच येणारे सण उत्सव काळात जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरीता पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबई पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये अकोला जिल्हयांतील गुंडप्रवृत्तीचे पाच सराईत गुन्हेगारांवर आज हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.






अकोला जिल्हयातील पोलीस स्टेशन उरळ हद्दीतील इमाम खान सुजात खान (वय ३८ वर्ष रा. गायगाव ता. बाळापुर जि. अकोला), रामा पाटील उर्फ प्रसाद उर्फ रामा साहेबराव सुलतान (वय २४ वर्ष रा.लोहारा ता. बाळापुर जि. अकोला) पोलीस स्टेशन पातूर येथील  अमोल सुभाष डाबेराव (वय ३१ वर्ष रा. बेलोरा ता. पातुर जि. अकोला) यांना मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (अ) (ब) अन्वये  उपविभागीय दंडाधिकारी बाळापुर यांचे आदेशाने अकोला जिल्हयातुन एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे.


पोलीस स्टेशन तेल्हारा येथील नितीन गजानन आमझरे (वय ३२ रा. आडसुळ ता. तेल्हारा जि. अकोला) याला मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (अ) (ब) अन्वये उपविभागीय दंडाधिकारी अकोट यांचे आदेशाने अकोला जिल्हयातुन सहा महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे.


पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर येथील रुपेश श्रीकृष्ण काळे (वय ३२ रा. वसंत नगर, मुर्तिजापुर ता. मुर्तिजापुर जि. अकोला याला मुंबई पोलीस अधिनियम कलम ५६ (अ) (ब) अन्वये  उपविभागीय दंडाधिकारी मुर्तिजापुर यांचे आदेशाने अकोला जिल्हयातुन सहा महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे.




" अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका, आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.”

बच्चन सिंह

जिल्हा पोलीस अधिक्षक,

अकोला  

टिप्पण्या