akola-police-crime-news-2024: माना पोलीस स्टेशन हद्दीत 141 किलो गांजा जप्त, अवैध दारु अड्ड्यावर धाड, चार सराईत गुन्हेगार हद्दपार





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पोलीस स्टेशन माना हद्दीत आरोपी कडून 141 किलो ग्रॅम गांजासह 53,66,600/-रूपये किमतीचा माल जप्त करण्यात आला.




मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास पो.स्टे माना परिसरात पोलीस पट्रोलिंग करत असतांना, माना फाटया जवळ अमरावती कडुन मुर्तिजापुरकडे जाणा-या एन एच 53 रोडवर टाटा कंपनीचा 10 टायर ट्रक क्रमांक डब्लु बी 23 डी 7237 हायवेच्या कडेला उभा दिसला.  ट्रकच्या बाजुला एक इसम संशयास्पदरित्या उभा दिसला. त्याच्या बाजुला जमिनीवर पिवळ्या रंगाच्या भरलेल्या 04 पोते दिसुन आले. पोलीसांनी इसमाजवळ जावुन त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पिंटु कृष्णा दास (रा कलकत्ता) असे सांगितले. पोलीसांना पोत्यांमध्ये गांजा असल्याचा संशय आल्याने लागलीच, एनडीपीएस कायदयातील तरतुदीचा अवलंब करून आरोपी पिंटु कृष्णा दास याचे ताब्यातुन चार गोण्या मधील एकुण 141 कि.ग्रॅ.330 ग्रॅम गांजा, प्रति किलो 20,000 रू प्रमाणे एकुण किंमत 28,26,600/- रू चा गांजा जप्त केला. तसेच आरोपी कडे असलेला व्हिओ कंपनीचा मोबाईल किं. 40,000/-रू, गुन्हयात वापरलेला ट्रक क्रमांक डब्ल्यु बी 23 डी 7237 किमंत 25,00,000/-रू. असा एकुण 53,66,600/-रु. चा मुद्देमाल गुन्हयात जप्त केला .



कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह , अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे , उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि सुरज सुरोशे, ठाणेदार पो.स्टे माना, पोउपनि गणेश महाजन, पोहेकॉ उमेश हरमकर , पोकों पंकज वाघमारे पोकॉ नंदकिशोर हिरुळकर, जयकुमार मंडावरे  यांनी केली.




अवैध दारूच्या धंदयावर छापा



स्थानिक गुन्हे शाखा अकोला कडुन लोकसभा निवडणुकी 2024 च्या अनुषंगाने शहरात अवैध दारूच्या धंदयावर छापा कारवाई करून आठ आरोपी सह 3,45, 180 / रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


आगामी येणा-या लोकसभा निवडणुकी 2024 च्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक अकोला बच्चन सिंह यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे.शाखा अकोलाचे प्रभारी अधिकारी पोलीस निरिक्षक शंकर शेळके यांनी अकोला जिल्हयातील वेगवेगळया पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये अवैद्यरित्या विना परवाना देशी व गावठी हातभट्टीची दारू विकणा-या व त्यांची वाहतुक करणारे आरोपीतांविरुध्द स्था.गु.शा. अकोला येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथके गठीत करून त्यांचेकडुन देशी दारूच्या चार केसेस करून 08 आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचे कब्जातुन एकुण देशी दारूचा 39,780/ रु चा मु‌द्देमाल व 4 मोटारसायकल  किँमत अंदाजे 2 ,30,000/ रु च्या जप्त करण्यात आल्या.


तसेच गावठी हातभट्टीच्या दारू व सडवा मोहची 01 केस करून 02 आरोपी कडुन एकुण 81,400/ रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असा एकुण आज पावेतो एकुण 3,45,180 रूपयांचा मु‌द्देमाल जप्त करून संबधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला.


कार्यवाही पोलीस अधिक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधिक्षक  अभय डोंगरे , यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. राजेश जवरे व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.




निवडणुक पुर्व हद्द‌पारीचे सत्र सुरु. अकोला जिल्हयांतील गुंडप्रवृत्तीचे 4 सराईत गुन्हेगार कलम 56 मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत हद्दपार


अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता याकरीता पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोला जिल्हयातील पोलीस स्टेशन सिव्हील लाईन ह‌द्दीतील कुणाल प्रदिप देशमुख (वय 23 वर्ष रा. फत्तेपुरवाडी, द्वारका नगरी, मोठी उमरी, अकोला) तसेच पोलीस स्टेशन रामदास पेठ हद्दीतील भोला रामचंद्र तिवारी (वय 27 वर्ष रा. पवनसुत अपार्टमेंट. तापडिया नगर, अकोला ता. जि. अकोला) यांना मुंबई पोलीस अधिनियम कलम 56 (अ) (ब) अन्वये मा. उपविभागीय दंडाधिकारी, अकोला यांचे आदेशाने दोन्ही जाबदेणार यांना अकोला जिल्हयातुन सहा महिन्याकरीता हद्द‌पार करण्यात आले आहे.


पोलीस स्टेशन अकोट शहर येथील अब्दुल सुलतान अब्दुल ईरफान (वय 22 रा. ताजनगर, अकबरी प्लॉट, अकोट) तसेच पोलीस स्टेशन अकोट ग्रामिण हद्दीतील संतोष दिनकर काळे, (रा. वडाळी देशमुख ता. अकोट जि. अकोला) याला मुंबई पोलीस अधिनियम कलम 56 (अ) (ब) अन्वये मा. उपविभागीय दंडाधिकारी सा., अकोट यांचे आदेशाने दोन्ही जाबदेणार यांना अकोला जिल्हयातुन सहा महिन्याकरीता हद्दपार करण्यात आले आहे.


पोलीस अधिक्षक बच्चन सिंग यांनी पदभार स्विकारल्यापासून अकोला


जिल्हयातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 27 सराईत गुन्हेगारांना अकोला जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे.


अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता राहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांवर येणा-या निवडणुका आगामी सण उत्सव काळात एमपीडीए व इतर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे "असा इशारा जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.


टिप्पण्या