akola-city-cultural-hall-fund: सांस्कृतिक भवनाचे काम लवकरच पूर्णत्वास जाणार; शासनाकडून 15 कोटी रुपयाचा अतिरीक्त निधी मंजूर; आमदार सावरकर यांच्या प्रयत्नांना यश





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरातील भव्य आणि अद्यावत सांस्कृतीक भवनाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनाकडून  रु. १५.०० कोटी  रुपयाचा अतिरीक्त निधी मंजूर करण्यात आला असून, याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुखमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार आमदार रणधीर सावरकर यांनी मानले.



अकोला शहरातील सांस्कृतिक  भवनाचे   रखडलेले काम पूर्ण करण्यासठी मागील २ वर्षांपासून आ. रणधीर सावरकर सतत प्रयत्नशील होते, परंतु  सदर काम धसास नेण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना  राज्यातील सत्ता परिवर्तना नंतरच  यश  आल्याने आता  अकोला राज राजेश्वर नगरीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या सुमारे १२०० आसनी भव्य आणि अद्यावत सांस्कृतिक भावनाचे कामा पूर्ण करण्यासाठी शासनाने १५ कोटी रुपयाचा अतिरिक्त भरीव निधी मंजूर केला आहे. अकोला शहराच्या सांस्कृतिक कला विश्वाला आकार देऊन स्थानिक कलावंतांना वाव देण्यासाठी अकोला शहरात भव्य आणि अद्यावत सांस्कृतिक  भवन असावे या करिता माजी केंद्रीय राज्यमंत्री खा संजयभाऊ धोत्रे   तसेच स्व. गोवर्धन शर्मा सतत आग्रही राहून त्यांनी या करीता शासनाकडे मंजुरी आणी निधी  उपलब्धते साठी प्रयत्न केला होता.



सांस्कृतिक भावनांचे काम पूर्ण व्हावे  या करीता आमदार रणधीर सावरकर  राज्याचे मुख्यमत्री  तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचेकडे निधी मंजुरी साठी सतत प्रयत्नशील होते. त्याची फलश्रुती म्हणजे सांस्कृतिक भावनाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी शासनाकडून १५ कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्या बाबत आ रणधीर सावरकर यांनी समस्त कला प्रेमी व नागरिकांचे वतीने आभार यक्त केले.  



सांस्कृतिक भवन निर्माण करण्यासाठी  अकोला मनपा क्षेत्राअंतर्गत मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नगर विकास विभागाकडून, अकोला शहरातील सांस्कृतीक भवनाकरीता रु. १५.०० कोटी इतका निधी संदर्भिय शासन निर्णय क्र. संकिर्ण - २०१५ /प्र.क्र.८० /नवि १६, दि. १७.११.२०१५ अकोला महानगरपालीका करीता निधी प्राप्त झाला होता, सदर काम नियोजीत कालावधीनुसार काम पूर्ण करण्यास तसेच कामाचा आवाका लक्षात घेता निधी अपुरा पडला असल्याने निर्माण झालेल्या अडचणीमुळे अखर्चीत ५ कोटी रुपये नीधी शासनास करावा लागल्याने सदर सांस्कृतिक भावनाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे, कामाचे वाढलेले दर लक्षात घेता व अपुर्ण काम पूर्ण करण्याकरिता १५ कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता लक्षात घेऊन निधीची मागणी करण्यात आली होती. शासन निर्णय क्रमांक मनपा - २०२४ /प्र.क्र.४० (२२) / न.वि -१६ (ई-७३१३७१) दिनांक 1 मार्च २०२४ अन्वये शासनाने निधी मंजूर केलेला आहे.





सांस्कृतिक भवनांच्या अपूर्ण कामा सोबतच सदर सांस्कृतीक भवनाच्या आंतरीक नक्षीकाम, फर्निचर, स्टेज डेकोरेशन विद्युतीकरण, सीसीटीव्ही, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पार्कीग (पेव्हर्स), फायर लायटींग, अंतर्गत रस्ते, अंतर्गत स्ट्रीट लाइटिंग, रंगरंगोटी, सोलर सिस्टीम व इतर कामे तातडीने पूर्ण करण्यात येऊन, शहरातील कला रसिकांचे सेवेत भव्य आणि अद्यावत असे  सांस्कृतिक भवन  लवकरच लोकार्पित होणार आहे, असे आमदार सावरकर यांनी सांगितले.

टिप्पण्या