walkathon-road-safety-aware: रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी वॉकथान; ‘वॉक ऑन राईट’ चा संदेश देत प्रथमच उजव्या बाजूने वॉकथानला सुरुवात





ठळक मुद्दा 

प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री वसे - दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान 






 

भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : हेल्मेट न घातल्याने मोठ्याप्रमाणात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाणही अधिक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबवले जाते.या माध्यमातून गाडी चालताना घेण्यात येणारी काळजी संदर्भात जनजागृती केली जात आहे. अकोल्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे वॉक ऑन राईट व हेल्मेट जनजागृतीसाठी आज सकाळी शहरात वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाडी चालवताना नियमांचं पालन करणार असल्याची शपथ सुद्धा घेण्यात आली. शहरातील अनेक शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या हेल्मेट विषयी जनजागृती वॉकथॉनमध्ये सहभाग घेतला.




प्रादेशिक परिवहन कार्यालयाने काढलेल्या या रॅलीमध्ये विशेषतः ‘वॉक ऑन राईट’ चा संदेश देत प्रथमच उजव्या बाजूने वॉकथॉनला सुरुवात झाली,  हे या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले.







प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत 13 फेब्रुवारी 2024 रोजी रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी वसंत देसाई स्टेडियम येथून प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत Walkethon चे आयोजन करण्यात आले होते. या  वॉकथॉन मध्ये  बहुसंख्य नागरिक व तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 



वॉकथॉन  वसंत देसाई स्टेडियम येथून  जिल्हाधिकारी अजित कुंभार तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री वसे दुतोंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. अग्रसेन चौक-दुर्गा चौक-सिविल लाइन रोड-पोस्ट ऑफिस चौक-बस स्थानक परिसर समोरून टॉवर चौक व पुन्हा वसंत देसाई स्टेडियम येथे येऊन समापन करण्यात आले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी स्वलिखित रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. 




कार्यक्रमात प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत रस्ता सुरक्षा संदेश देणारे सेल्फी पॉईंट उभारण्यात आलेले होते. या सेल्फी पॉईंट मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आपले सेल्फी घेऊन रस्ता सुरक्षा जागृती बाबत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.  





वॉकथानमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोलाचे प्राध्यापक, विद्यार्थी, स्काऊट गाईड भवनचे छात्र, विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, त्याचप्रमाणे मैदानावर पोलीस भरतीची तयारी करणारे तरुण,  प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी वृंद आदीसह विविध क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक व विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.



टिप्पण्या