unseasonal-rain-akola-district: हरभरा,गहू, कांदा पिकाचे प्रचंड नुकसान; गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याने येत्या तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. आज अकोला शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारच्या रात्री झालेल्या या धुंवाधार पावसामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.



या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका तेल्हारा तालुक्याला बसण्याची शक्यता आहे. तेल्हारा तालुक्यातील खापरखेड या गावात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. बोराच्या आकाराची ही गारपीट सुमारे 15 मिनिटं झाल्याने या भागातील हरभरा, गहू पिकासह  फळपिकांच मोठं नुकसान होण्याची चिन्ह आहेत. तर तेल्हारा तालुक्यातीलच दहिगाव येथे मोठं बाभळीच झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.



अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यातील मुर्तिजापूर, तेल्हारा , पातूर  आणि आकोट तालुक्यात रब्बीतील गहू, कांदा, हरभरा यासोबतच इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवत, होत्याचे नव्हते केले. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा एकदा सरकारकडे मदतीची आस लावून बसले आहे.



अकोला जिल्ह्यात कालच्या गारपीट आणि अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय तो पातूर,अकोट , तेल्हारा आणि त्या पाठोपाठ मूर्तिजापूर तालुक्याला. मूर्तिजापूर तालुक्यातील दहिगाव गावंडे परिसरालाही या प्रकोपाचा मोठा फटका बसला. गहू, कांदा, हरभरा यासोबतच इतर फळपिकांचे मोठे नुकसान झाले. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास अक्षरश: पळविला. काही दिवसांतच घरी येणाऱ्या गहू  या पिकाचं यामध्ये मोठं नुकसान झालं.शेतकरी आता मदतीसाठी सरकारकडे आस लावून बसले. 

 

तेल्हारा मध्ये  2433 हेक्टर वर नुकसान झाले असून, आज दानापुर येथे तहसिलदार   समाधान सोनवणे. व तलाठी अंकुश मानकर, सरपंच सपना वाकोडे , कृषी सहाय्यक महेश इंगळे यांनी नुकसान भागाची पाहणी केली.





रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंजर परिसरात गहू, हरभरा, कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.




टिप्पण्या