tributes-mahatma-gandhi-akl: महात्मा गांधी अस्थिकलश विसर्जन स्मृती कार्यक्रम निमित्त पूर्णा नदी घाटावर सर्वधर्म प्रार्थना सभेतून आदरांजली






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 30 जानेवारी रोजी हत्या करण्यात आली .त्यानंतर तेरा दिवसांनी म्हणजेच 12 फेब्रुवारी रोजी त्यांचा अस्थीकलश देशभरातील विविध नद्यांमध्ये  विसर्जित करण्यात आला होता.



अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा:अकोल्यात पश्चिम विदर्भातील एकमात्र रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन...


विदर्भातील अकोला येथे त्यांचा अस्थीकलश माजी मंत्री ब्रजलाल बियाणी ,सर्वोदयी रामकृष्ण आढे व तत्कालीन राजकीय नेत्यांनी आणला होता.अकोल्याजवळील वाघोली येथे पूर्णा नदी घाटावर अस्थीकलशाचे विसर्जन केले होते. तेव्हापासून आज तागायत अकोला जिल्हा सर्वोदय मंडळ व महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गांधीग्रामचे वतीने अस्थिकलस स्मृती कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. पंचक्रोशीतील नागरिक ,शालेय विद्यार्थी, सर्वोदय कार्यकर्ते मिरवणुकीने पूर्ण आदी घाटावर जाऊन सर्व धर्म प्रार्थना सभेत सहभाग घेतात. गीताईचे पठण केले जाते. त्यानंतर .पूर्णा नदी पात्रात जलपूजनाने गांधीजींना भावपूर्ण आदरांची वाहिली जाते.



             

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विलास झांबरे , अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष बबनराव  कानकिरड, सचिव डॉक्टर मिलिंद निवाने,  सुमीरमा फाउंडेशनच्या डॉक्टर पूजा खेतान, कीर्ती काळे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष गोवर्धन दादा खवले, काशिनाथ दाते गुरुजी, राष्ट्रीय एकात्मता प्रदर्शनाचे प्रवर्तक साहेबराव तायडे, बाभुळगाव चे सर्वोदय मित्र रामचंद्र नारायण राऊत, सर्वोदय संवाद यात्रेचे संयोजक  अनिल मावळे, महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय रामचंद्र इंगळे, कोषाध्यक्ष ऋषिकेश पाटील असावा, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानदेवराव भाकरे ,दोनवाडा येथील सर्वोदय कार्यकर्ते लखोजी सानप, गणेशराव आढाव यांचे सह शेकडो सर्वोदय कार्यकर्ते व शालेय विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थांनी या अस्थिकलस स्मृती कार्यक्रमात सहभाग घेतला .महात्मा गांधी विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय येथे महाविद्यालयाच्या प्रांगणात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास  ज्येष्ठ सर्वोदयी महादेवराव भुईभार यांनी सूतमाला अर्पण करून अभिवादन केले. प्राचार्य विलास झांबरे यांचे अध्यक्षतेत अकोला जिल्हा सर्वोदय मंडळाच्या सर्वोदय संवाद यात्रा टप्पा क्रमांक एकची समारोप सभा संपन्न झाली.



सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी गांधी विचारांचा मार्गच या देशाला अखंड ठेवू शकतो म्हणून विद्यार्थ्यांनी सत्य अहिंसेवर आधारित सर्व साहित्य तसेच महात्मा गांधींचे साहित्य वाचण्याचे आवाहन केले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज निसर्गोपचार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन दादा खवले यांनी महात्मा गांधी वरील सुश्राव्य भजन सादर करून गांधीजींच्या सत्याचे प्रयोग या आत्मकथेवर उद्बोधन केले.



प्रसिद्ध नेत्रतज्ञ व सुमीरमा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर पूजा खेतान यांनी महात्मा गांधी हे अवघ्या जगाला मिळालेली देणगी आहे .त्यांचे अफाट कर्तृत्व भारतीय कधीही विसरू शकणार नाही. स्त्री पुरुष समानता स्त्रीभ्रूणहत्या सारख्या विषयाकडे महात्मा गांधींनी समाजाला त्या काळात दिशादर्शन केले. महात्मा गांधीजींचे जीवन व कार्य आम्हाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन  केले.



सर्वधर्म प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विजय चव्हाण यांनी केले. प्रा.धनंजय पटोकार ,प्रा. संजय  म्हैसणे, बाळकृष्ण चंदन ,रवींद्र  देशमुख, जगन्नाथ बर्डे, प्राध्यापक प्रफुल्ल डोंगरे, संदीप  इंगळे, प्रकाश पाटणकर ,राजीव वाटमारे, प्रा.अतुल फोकमारे ,विवेक नहाटे, ममता खुमकर ,सरिता ठाकूर, मनीषा तळोकर, राजेश धांडे, संदीप कोळेकार ,नारायण बावणे ,गणेश फुले आदी यावेळी उपस्थित होते. 

टिप्पण्या