tree-plantation-environment : निसर्ग पहाट तर्फे वृक्ष प्रदान सोहळा जल्लोषात साजरा; जीवनात पर्यावरण व कलेला एकत्रित स्थान द्यावे- ॲड. संग्राम गाडगीळ

निसर्ग पहाटचे संस्थापक अध्यक्ष ॲड संग्राम गाडगीळ विद्यार्थ्यांना वृक्षरोप प्रदान करताना 





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: निसर्ग पहाट संस्थेच्या वतीने मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी श्री शिवाजी महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय आणि बाबासाहेब ढोणे कला महाविद्यालयात वृक्ष प्रदान सोहळा पार पडला. निसर्ग पहाटचे संस्थापक अध्यक्ष यांनी काळाची गरज ओळखून तरुणाईला वृक्षारोपण व संवर्धनाचे महत्व प्रत्यक्ष कृतीतून पटवून दिले.


जनहितार्थ जारी: प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अकोला 



श्री शिवाजी महाविद्यालय 



स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयात प्राचार्य अंबादास कुलट व निसर्ग पहाटचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संग्राम गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष प्रदान सोहळा जल्लोषात संपन्न झाला. 



प्राचार्य अंबादास कुलट यांनी पर्यावरण व वृक्ष लागवडीचे विद्यार्थ्यांना महत्त्व सांगितले, व मोलाचे मार्गदर्शन दिले. ॲड. गाडगीळ यांनी सुध्दा मुलांना पर्यावरण व वृक्ष संगोपनाचे महत्त्व सांगितले. यावेळी कार्यक्रमाला बॉटनी विभागाचे एच.ओ. डी. श्री कोचे व प्रा. पाटील मॅडम यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपली उपस्थिती लावली. 



आयुर्वेदिक महाविद्यालय 



यानंतर आयुर्वेदिक महाविद्यालय, अकोला येथे सुध्दा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रा.समाधान कंकाळ व निसर्ग पहाटचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संग्राम गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व बिडवई सर, मधुमती नाव्हकार यांच्या उपस्थितीत सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांनी उत्साहात सक्रीय सहभाग घेत वृक्षारोपण केले. प्रा. कंकाळ यांनी मार्गदर्शन करीत मुलांना आयुर्वेदाचा आणि वृक्ष लागवडीला किती जवळचा संबंध आहे, याचे महत्त्व सांगितले. ॲड. गाडगीळ यांनी सुध्दा वनस्पती औषधीवर विद्यार्थ्यांनी नवीन प्रयोग व संशोधने करावी, असे सांगितले. 


बाबासाहेब ढोणे कला महाविद्यालय



बाबासाहेब ढोणे कला महाविद्यालयात सुध्दा वृक्ष प्रदान व लागवड सोहळा संपन्न झाला. प्रा. श्री बोबडे , प्रा. सौ. बोबडे  व प्रा. नागपूरे आणि निसर्ग पहाटचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संग्राम गाडगीळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रा. बोबडे  आणि ॲड. गाडगीळ यांनी निसर्ग आणि वृक्षवल्ली यांचा संगम करीत आपल्या जिवनात पर्यावरणाला व कलेला एकत्रित स्थान द्यावे, असे प्रतिपादन केले.





टिप्पण्या