shivaji-maharaj-jayanti-2024: अकोला वकील संघातर्फे छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती साजरी




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला वकील संघाच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा सोमवार 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30  वाजता जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात पार पडला. 



कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहासाचे अभ्यासक व व्याख्याते ॲड. योगेश पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व सदस्य ॲड. मोतीसिंह मोहता, तसेच महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. बी.के. गांधी यांची उपस्थिती होती.



योगेश पाटील यांनी याप्रसंगी आपल्या व्याख्यानात सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजाची युद्धनीती आणि त्यांची बुद्धिमत्ता अफाट होती. आपल्या विश्वासू मावळ्यांच्या सहकार्याने त्यांनी शेकडो किल्ले जिंकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची आजही समाजाला गरज आहे. 



 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. हेमंत मोहता यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे सुसंस्कार, दूरदृष्टी, चिकाटी, आणि त्यांची वैचारिक पातळी किती उंच होती, यावर त्यांनी प्रकाश टाकला. 



या कार्यक्रमाला अकोला वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड. नरेंद्र बेलसरे , महिला उपाध्यक्ष ॲड. शितल राऊत, सचिव ॲड. विनय यावलकर, सहसचिव ॲड. शिवम शर्मा, ॲड. दुष्यंत धोत्रे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन ॲड. शिवशंकर राऊत तर आभार प्रदर्शन ॲड. नरेंद्र बेलसरे यांनी केले.



या शिवजयंती सोहळ्याला अकोला वकील संघाचे विधीज्ञ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती ॲड. नरेन्द्र बेलसरे यांनी दिली.




टिप्पण्या