raid-illegal-moneylenders-akl: अवैध सावकारी विरोधात धाडसत्र: धाडीत दस्तऐवज जप्त, 9 धाड पथकांनी केले शोध कार्य



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ नुसार उपनिबंधक, सहकारी संस्था तालुका अकोला कार्यालयामार्फत कार्यालयात अवैध सावकारीच्या प्राप्त तक्रारींचे अनुषंगाने  जिल्हाधिकारी, अकोला, पोलीस अधीक्षक, अकोला,  जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला,  जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, अकोला यांचे मार्गदर्शनामध्ये अकोला शहर भागामध्ये सहकार विभागाचे एकूण ९ धाड पथकांनी शोध कार्य पूर्ण केले.  





या कार्यवाहीमध्ये इसार पावती-१८, मूळ छायाप्रत खरेदीखत ६१, करारनामा-१३, पावती, कोरे धनादेश-२३, लिहिलेले धनादेश-२९, रद्द केलेले धनादेश-६, उसनवारी पावती-१, लायकी दाखला-१, कोरे लेटर हेड-१, नोंदी असलेल्या डायरी-९, ताबा पावती व भरणा पावती-६, वाहनविक्री पावती-१, आर. सी. कार्ड, तक्रारकर्ते यांचे संबंधाने दस्तऐवजांच्या छायाप्रती धारिका-१ प्राप्त झालेल्या आहेत.



धाडीमधील जप्त दस्तऐवजांची पडताळणी तसेच प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने चौकशी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल.




या प्रकरणी पथक प्रमुख म्हणून  अभयकुमार कटके, सहाय्यक निबंधक (प्रशासन),  ए. एम. भाकरे,  मनसुटे,  एस. डी. नरवाडे,  वाय.पी. लोटे,  डी. डब्ल्यू, सिरसाट,  एस. एस. खान,  आर. आर. विटणकर, ए.ए. मनवर तसेच फिरते पथकामध्ये  ज्योती  मलिये, उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका अकोला तथा  जी. पी. भारस्कर, सहकार अधिकारी श्रेणी-२ यामध्ये सहभागी होते. 



कार्यवाहीमध्ये लेखापरीक्षण विभाग, गट सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी, मत्स्य विभाग, जिल्हा सैनिक कार्यालय, पतसंस्था कर्मचारी पथक सहायक,पंच म्हणून तसेच पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांचा सहभाग होता.

टिप्पण्या