political news: कुणाल राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ अकोल्यात निदर्शने




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पोस्टर्सची खोडतोड केल्या प्रकरणी नागपूर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांना नागपूर पोलिसांनी अटक केली होती. या कारवाई नंतर राज्यात राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली.  कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन "मोदी की गॅरंटी" अशा आशयाच्या पोस्टर्स वर काळे फासले होते. तसेच मोदी या शब्दावर दुसरे स्टिकर्स लावून पोस्टर्सची खोडतोड केली होती. याचीच पूनार्वृती आज अकोल्यात झाली आहे.




पंतप्रधान मोदी यांच्या फोटोवर कोणताही आक्षेप न घेता केवळ पोस्टर वर छापलेल्या ' मोदी ' या नावावर आक्षेप घेत अकोला युवक काँग्रेसने अकोला जिल्हा परिषद जवळ लावण्यात आलेल्या मोदीं यांच्या पोस्टरवरील ' मोदी ' शब्दावर ' भारत ' नावाचे शब्द स्टिकर लावला. देशातलं सरकार भारत सरकार असून मोदी सरकार नव्हे अशा तिव्र शब्दात आंदोलकांनी निषेध नोंदवित नारेबाजी केली. तसेच कुणाल राऊत यांच्या अटकेचा निषेध नोंदविला.




देशातील वाढलेली हुकूमशाही,जुलमी धोरण, मोदी आणि शाह यांनी संविधान आणि लोकशाही संपवण्याचा घातलेला घाट. केंद्रातील तसेच राज्यातील सरकार जनतेच्या पैशातून भारत सरकार ऐवजी मोदी सरकार या नावाने भाजपाचा प्रचार करत आहे. याचाच निषेध म्हणून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल  राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला युवक काँग्रेसचे अध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वात, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परीषद जवळील शासनाच्या योजनांची  माहिती देणाऱ्या फलकावरिल ‘मोदी सरकार’ असा उल्लेख खोडून ,’भारत सरकार’ हे स्टिकर लावून निषेध करण्यात आला. नागपुर येथे कांग्रेसचे युवा नेते कुणाल राऊत यांना अटक झाली होती. त्याचा सुद्धा यावेळी तीव्र निषेध करण्यात आला.





यावेळी आकाश कवडे यांच्यासह राहुल सारवान, अंकुश तायडे, मो. शारिक, फैसल खान, अभीजीत तवर,अंकुश गावंडे, संतोष निधान, सलीम अली, वैभव सुळकर, अझरुद्दीन कमलुद्दीन, सम्राट ठाकरे, तेजस देवबाळे, मुकुंद सरनायक, शोएब खान, अर्शद खान, संदेश वानखडे, सोहम गवई, राम कोकाटे, चेतन चंदूरकर, निलेश तोरणे, वैभव हिराळकर आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.




टिप्पण्या