political news: एमआयएमला भाजपची बी टिम म्हणणारेच आज माेदींसाेबत- असदुद्दीन ओवैसी



ठळक मुद्दे

*महाराष्ट्रातील राजकीय पक्ष धर्मनिरपेक्ष नाहीत तर एमआयएमला भाजपची बी टिम म्हणणारेच आज माेदींसाेबत आहेत. 





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे शिंगणे 

अकोला: राम मंदिर निर्माणचे समर्थन करणारे उद्धव ठाकरे हे शरद पवार व काँग्रेसच्या साेबत असून, महाराष्ट्रात काेणीच धर्मनिरपेक्ष नाहीत, अशा शब्दात ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन अर्थात एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी महाविकास आघाडीवर जाहीर सभेत टिकास्त्र डागले.


एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची अकोला शहरात  रविवारी सायंकाळी जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते.



यावेळी त्यांनी मंचावरून पुन्हा बाबरी जिंदाबादचा नारा लगावला. मराठ्यांना आरक्षण देता मग मुस्लिमांचा गुन्हा काेणता? राज्य सरकारकडून मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आहे,त्यांना आरक्षण द्या, मग मुस्लिमांचा गुन्हा काेणता, असा सवाल खा. ओवैसी यांनी केला.


जनहितार्थ जारी: प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अकोला 


छत्रपती शिवाजी महाराज हे  इस्लामच्या विराेधात नव्हते, ते तर गरीबांचे, संपूर्ण रयतेचे राजे हाेते.मात्र  आर एस एस त्यांना मुस्लिम विराेधी असल्याचे चुकीचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न करीत आहे,असा आराेप असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात केला.




टिप्पण्या