political-news-maharashtra : मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस व ब्राह्मण समाजाची माफी मागावी- आमदार रणधीर सावरकर





भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: मराठा समाजाला आरक्षण मिळावा, यासाठी अभ्यासपूर्ण आखणी करून राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस सातत्याने कार्यरत होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, नामदार फडणवीस  सर्वांना सोबत घेऊन आरक्षण यासाठी राज्यातील प्रत्येक स्तरावर सर्वे करून अहवाल तयार केला व कोर्टात टिकेल असा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु राजकीय महत्त्वकांक्षा व कोणाच्या इशाऱ्यावर मनोज जरांगे खालच्या स्तरावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहे. हा प्रकार सहन केल्या जाणार नाही, त्यांनी ताबडतोब माफी मागावी. ब्राह्मण समाजाविषयी व त्यांच्या परिवाराविषयी अपशब्द वापरण्याचा प्रकार करू नये. मराठा समाज शांततेने जागतिक स्तरावर आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा आंदोलन करणारा असून जरांगे यांचा वक्तव्याचा जाहीर निषेध भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केला.




समाजाला आरक्षण मिळावा यासाठी सर्वपक्ष अनुकूल आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण देण्यात आला होता. सुप्रीम कोर्टात टिकेल, असा निकाल होता. परंतु सरकार गेल्यानंतर योग्य नियोजन न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकला नाही. यासंदर्भात  मागण्या लक्षात घेऊन उपाय योजना  मुख्यमंत्री राज्यातील एकनाथ शिंदे अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करण्यात आले. व मोठ्या प्रमाणात सर्वे करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला व अन्य मागण्या सुद्धा मंजूर करण्यासाठी सरकार अनुकूल असताना केवळ प्रसिद्धीसाठी रोज नवीन नवीन आरोप करून देवेंद्र फडणवीस सारख्या सर्व समाजाला घेऊन येणाऱ्या नेत्यावर अशा प्रकारचा आरोप राजकीय हेतूने करू नये. मराठा समाज हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये कार्यरत आहे. मराठा समाजावर प्रत्येक समाजाचा विश्वास आहे. समर्थन आहे. परंतु द्वेष निर्माण करण्याचा काम जरांगे यांनी करू नये. 

केवळ राजकीय हेतूने कुणाच्या इशाऱ्यावर, स्वतःच्या फायद्यासाठी समाजाचा उपयोग करू नये, अशी विनंती सुद्धा आमदार सावरकर यांनी करून मराठा समाज सर्व समाजाचा सन्मान करणारा समाज असल्याचेही त्यांनी सांगितले. 



नामदार फडणवीस राज्यातील सर्व जात धर्म पंथातील आमदार लोकप्रतिनिधी, कार्यकर्ता यांना सोबत घेऊन ‘एकेला देवेंद्र क्या कर सकता’ हे कृतीने महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. विकासासोबत सर्वांना सोबत घेऊन चालण्याची किमया नामदार फडणवीस यांच्यामध्ये असल्यामुळे अशा प्रकारचा निवडणुकीच्या काळात अस्थिर महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असे आमदार सावरकर यांनी सांगितले.


टिप्पण्या