pankaj-udhas-passed-away: ‘चिठ्ठी आयी है…’, एक तूही धनवान है गोरी 'फेम गझल गायक पंकज उधास काळाच्या पडद्याआड





भारतीय अलंकार न्यूज 24

pankaj udhas passed away: 

आपल्या जादूई आवाजाने पाच दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबाबतची माहिती मुलगी नायब उधास यांनी शेअर केली आहे.  चित्रपट सृष्टी, संगीत क्षेत्र सह त्यांचा चाहता वर्ग सोशल मीडियावर आपल्या आवडत्या  गायकाला अखेरची श्रद्धांजली वाहतो आहे. 


पंकज उदास यांनी गायलेली अनेक चित्रपट गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. नाम चित्रपटातील ‘चिठ्ठी आयी है’ ही गझल आणि खासगी अल्बम मधील ‘चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल एक तूही धनवान है गोरी बाकी सब कंगाल’ आहिस्ता अहिस्ता..’ तसेच  ‘ना कजरे की धार’, ‘आज फिर तुमपे प्यार आया है’, ‘एक तरफ उसका घर’ ‘थोडी थोडी पिया करो’ अशा अनेक गझल, गाणी अजरामर आहेत.  याशिवाय गुजराती गाणी त्यांनी गायिली आहेत. 1980 दशकात ते 'एक तूही धनवान है गोरी ' या गझल मुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

टिप्पण्या