manohar joshi passed away: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

  file image 




भारतीय अलंकार न्यूज 24

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची वयाच्या 87 व्या वर्षी  प्राणज्योत मालवली. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात  उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.





दरम्यान, मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना गुरुवारी दुपारी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 

काही महिन्यांपूर्वी मनोहर जोशी यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होत असल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.  त्यानंतर प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना सुटी देण्यात आली होती. 

प्रकृती अस्वास्थामुळे मनोहर जोशी  सक्रीय राजकारणापासून दूर होते. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 ला रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. 1995 साली ते युतीच्या सत्तेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते. मनोहर जोशी यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केले.


पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ट्विटर (एक्स) हॅण्डल वर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 


फोटो सौजन्य: ट्विटर (एक्स)




खासदार संजय धोत्रे, आमदार सावरकर यांनी वाहिली श्रध्दांजली 


भाजपा शिवसेना महायुतीची पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली अशा शब्दात खासदार संजय धोत्रे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

मराठी माणसासाठी सदैव तत्पर राहणारे तसेच कुशल संघटक महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे संसदीय अनुभव असणारे लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहणारे मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्राची संस्कृती क्षेत्राची फार मोठी हानी झाली अशा शब्दात भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

हिंदुत्वासाठी सदैव तत्पर राहणारे कोहिनूर कोचिंग क्लास च्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्राचा विकास करणारे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मार्गदर्शक  गमावला अशा शब्दात आमदार हरीश पिंपळे यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

कुशल प्रशासक कुशल संघटक उत्कृष्ट वक्ता अभ्यासू नेतृत्व हिंदुत्ववादी नेता आमच्यामधून निघून गेला ही आणि न भरणारी हानी झाली अशा शब्दात आमदार वसंत खंडेलवाल यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

आपली राजकीय वाटचाल शिवसैनिक म्हणून झाली शिवसैनिक म्हणून त्यांची मनोहर जोशी यांची वागणूक व लोकप्रतिनिधी म्हणून सन्मान देण्याची पद्धत तसेच शिवसेना विस्तारामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारे वेगवेगळ्या विषयाची जाण असणारे लोकनेते आमच्याकडून निघून गेले अशा शब्दात आमदार प्रकाश भारसाकले, यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली 



तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर पाटील जयंत मसने, विजय अग्रवाल , तेजराव थोरात चंद्रशेखर पांडे गुरुजी विजय  मालोकार, गिरीश जोशी, सुमन  गावंडे सिद्धार्थ शर्मा गीतांजली  शेगोकार, डॉक्टर शंकरराव वाकोडे प्रवीण हगवणे, अंबादास उबाळे माधव मानकर प्रशांत ठाकरे, विठ्ठल चतरकर, राजेश बेले वैशाली निकम चंदा शर्मा वैशाली शेळके कुसुम भगत  यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


  

टिप्पण्या