- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोला महानगर पालिकेच्या आयुक्त कविता द्विवेदी (आय ए एस) यांची अखेर विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथे सहायक आयुक्त पदावर बदली झाली आहे. लवकरच नवीन आयुक्तांकडे अकोला महानगराची कमान सोपवली जाण्याचीही शक्यता आहे.
आयुक्त कविता द्विवेदी गेल्या अडीच वर्षांपासून अकोल्यात कार्यरत आहेत. अकोला महापालिकेच्या इतिहासात अडीच वर्षे अधिकाऱ्याने महापालिका आयुक्तपद भूषविण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, महापालिकेतील प्रशासकाची भूमिकाही त्यांनी उत्तमरित्या पार पाडली आहे. अकोला महापालिकेतील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली, ज्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारविषयक समस्या सोडविण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली.
अकोला महापालिका आयुक्तांची बदली झाल्याची चर्चा होती. आज सामान्य प्रशासन विभाग, मुंबई यांचे पत्र आल्यानंतर त्यांची आता विभागीय सहायक या पदावर बदली करण्यात आली असल्याने आता या चर्चांना विराम मिळाला आहे.
शासनाचा बदली आदेश
डॉक्टर हेमंत वसेकर आयुक्त, पशुसंवर्धन पुणे यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प पुणे या पदावर.
श्री कौस्तुभ दिवेगावकर, प्रकल्प संचालक, स्मार्ट, पुणे यांची नियुक्ती आयुक्त, पशुसंवर्धन पुणे या पदावर.
श्री कार्तिकी एन एस यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे या पदावर.
श्री मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, मुंबई या पदावर.
श्री एम जे प्रदीप चंद्र यांचे नियुक्ती अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय मुंबई या पदावर.
श्रीमती कावली मेघना यांची, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट या पदावर.
कविता द्विवेदी महापालिका आयुक्त, अकोला यांची नियुक्ती अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे या पदावर.
श्री विजय सिंगल महाव्यवस्थापक, बेस्ट यांची नियुक्ती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई या पदावर.
श्री संजय सेठी यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव, परिवहन व बंदरे या पदावर.
श्री पराग जैन नैनोटिया, प्रधान सचिव (परिवहन व बंदरे) यांची नियुक्ती प्रधान सचिव, (माहिती तंत्रज्ञान) सामान्य प्रशासन विभाग, मुंबई या पदावर.
श्री ओ पी गुप्ता अप्पर मुख्य सचिव (व्यय) वित्त विभाग यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग या पदावर.
श्री राजेश कुमार यांची नियुक्ती अप्पर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग या पदावर बदली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा