inauguration-war-tank-akola: अकोला येथे वॉर टॅंक व हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण: शहिद स्मारक दीपस्तंभासारखी प्रेरणा देत राहील-पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील




भारतीय अलंकार न्यूज 24 

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला, दि. १० : देशासाठी आहुती देणाऱ्या शहिद व सैनिकांच्या स्मृती जपण्यासाठी शहरात शहिद स्मारक निर्माण झाले आहे. ते आपणा सर्वांना व येणाऱ्या पिढ्यांनाही दीपस्तंभासारखी प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.


अकोला शहरातील वॉर टॅंक व हुतात्मा स्मारकाचे लोकार्पण श्री. विखे पाटील यांच्या हस्ते आज झाले. 


देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती गौरव म्हणून शहरात शहीद स्मारक निर्माण झाले आहे.  सर्वांना प्रेरणादायी ठरणारी अशी स्मारके गावोगाव निर्माण व्हावीत, असे पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.





खासदार संजय धोत्रे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत नवीन पिढीला सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या शौर्यगाथाची माहिती व्हावी व देशभक्ती राष्ट्रभक्ती चेतना जागृतीसाठी 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या रणगाडा यांनी बंगलादेश निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. अशा रणगाडा (वॉर टँक) जनतेच्या सेवेत शनिवार 10 फेब्रुवारी शनिवार रोजी रुजू झाले याचा आनंद होत आहे,असे यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.




आमदार हरिश पिंपळे, स्वातंत्र्य सैनिक विलास मुंजे, जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी., महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, भाजपा ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल, खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुप धोत्रे, गिरीश जोशी,माधव मानकर, प्रशांत अवचार  यांच्या सह शहरातील अनेक मान्यवर, माजी सैनिक यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी माजी सैनिक व उपस्थितांशी संवाद साधला.










टिप्पण्या