- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
faulty-survey-shiv-sena-protest: नदीकाठावरील लोकवस्ती चुकीच्या सर्वेक्षणमुळे प्रभावित ; शिवसेना (उबाठा) करणार आंदोलन
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पत्रकार परिषदेत नकाशा दाखविताना श्री राजेश मिश्रा
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीच्या दोन्ही बाजूला नागरिक राहत आहेत. मात्र नदीला पावसाळ्यात येणाऱ्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे नदीचे पुराचे संभावीत क्षेत्र सोडून लोकवस्ती असावी, यासाठी शासनाचा पाटबंधारे विभागाचे अधिकारी घरीच बसून सर्व्हे करीत आहेत. त्यामुळे चुकीचा सर्व्हे होऊन लोकांना शहरातील सुमारे एक लाख लोकांना याचा त्रास होत असून, त्या चूक करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांची चूक दुरुस्त करून द्यावी. अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वतीने अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार,अशी चेतावणी आज अकोल्यात महानगर प्रमुख राजेश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अकोल्यात सन 1995 मध्ये, त्यानंतर 2002 आणि 2021 मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे शहरात सगळीकडे पाणीच पाणी होते. त्यानंतर शासनाच्या पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी चुकीचा सर्व्हे करून चुकीच्या ठिकाणी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन टाकली आहे. प्रत्यक्षात घटनास्थळी जाऊन प्रत्यक्षात मार्किंग केले नाही. त्यामुळे ले-आऊट झालेल्या ठिकाणी या लाईन आल्या तर काही ठिकाणी काही मंदिर तर काही लोकांच्या घरात या लाईन आल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या घरांची बांधकामे प्रभावीत झाली आहेत. मनपाच्या नगरविकास विभागाकडून नकाशाना परवानगी मिळण्याचे थांबले आहे. आधीच सत्ताधारी भाजपने शहराचा विकास 30 वर्षे मागे नेला आहे. त्यात या अधिकाऱ्याच्या चुकीने आणखी भर घातली आहे,असा आरोप मिश्रा यांनी केला. संबंधित विभागातील चूक करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांनी चूक दुरुस्त करून द्यावी, अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करुन अधिकाऱ्यांना जाब विचारणार,असे यावेळी मिश्रा म्हणाले.
यावेळी महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा यांच्यासह उपजिल्हा प्रमुख गजानन बोराळे, तरुण बगेरे, अनिल परचुरे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा