exemption-from-toll-collection: MH 30 पासिंग असलेल्या गाड्यांना टोल वसुलीत सुट द्या; 'वंचित'चे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कुरणखेड जवळ असलेल्या टोल नाक्यावरील अवैध वसुली तात्काळ  बंद करावी आणि MH 30 अकोला पासिंग असलेल्या वाहनांना टोल वसुलीत सुट  मिळावी, या मागणीसाठी वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी जन आंदोलन करत रास्ता रोको करण्यात आला. 



वीस किलोमीटरच्या आत नागरिकांना टोल लागणार नाही या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अकोला पासिंग असलेल्या गाड्यांना सूट देण्यात यावी, आतापर्यंत वसूल केलेली अवैध वसुली परत करण्यात यावी, अशा स्वरूपाच्या मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा श्रीकांत ढगे यांना निवेदन देण्यात आले. तसेच या निवेदनावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही वंचितच्या यावेळी आंदोलनकर्त्यानी  दिला. 




आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, मिडिया प्रमुख ॲड. नरेंद्र बेलसरे, विकास सदांशिव, पुष्पा इंगळे, प्रतिभा अवचार यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टिप्पण्या