court news: लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता





भारतीय अलंकार न्यूज 24 

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पीडितेला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपातून न्यायलयाने पुरावा अभावी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे.




पिडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून १२.१०.२०२२ रोजी पोलीस स्टेशन उरळ, येथे आरोपी अक्षय इंगळे विरुद्ध भा.द.वी. ची कलम ३७६, ३६३ सहकलम बाल-संरक्षण कायदा ४, ८, १२ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच अनुषंगाने पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून व पुरावे गोळा करून विद्यमान न्यायालयात आरोप-पत्र दाखल केले.



१०.०३.२०२२ रोजी सकाळी ४.०० वा. आरोपी अक्षय इंगळे याने पिडीतेस फोन केला व तिला पळून जाऊ असे म्हणाला. जर ती त्याच्या सोबत आली नाही तर तो स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करून टाकेल, अशी धमकी दिली व पिडीतेला मोटर सायकलवर घेवून आला. नंतर लग्नाचा आमिष दाखवून जयपूर लांडे, जी. बुलडाणा येथे पडीत शेतामध्ये थांबून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अश्या आरोपांवरून पोलिसांनी आरोपीस अटक करून त्याच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले.


सदर खटल्यात सरकारी पक्षाने एकूण ६ साक्षीदार तपासून त्यांची बाजू मांडली. आरोपीच्या वतीने त्यांच्या वकिलांनी आरोपीची बाजू मांडली व पिडीतेने दिलेल्या बयान मध्ये फरक आहे, ही बाब आरोपीच्या वकिलांनी विद्यमान न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिली. व पिडीतेची जन्म तारीख सिद्ध न होऊ शकल्या कारणाने न्यायालयाने आरोपीस दोषमुक्त केले.



दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अकोला यांनी आरोपी अक्षय इंगळे याला सदरहू गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले. न्यायालयात आरोपीतर्फे ॲड. पप्पु मोरवाल, ॲड. राकेश पाली, ॲड. आनंद साबळे, ॲड. नागसेन तायडे यांनी कामकाज पाहिले.


जनहितार्थ जारी: प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अकोला 



टिप्पण्या