- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
alankar-market-robbery-akola: अलंकार मार्केट चोरी : एकाच वेळी 6 ते 7 दुकाने फोडली, व्यापारी क्षेत्रात खळबळ
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला: रामदासपेठ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अलंकार मार्केटमध्ये काल रात्री चोरीची मोठी घटना घडली आहे. यामध्ये चोरट्यांनी एकाच वेळी 6 ते 7 दुकाने फोडल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
या चोरीमुळे किती नुकसान झाले, याबद्दल अद्याप माहिती प्राप्त झालेली नाही. मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये चोरी झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा