akola police: अति महत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर राहणारे मनोज लांडगे अखेर निलंबित; पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचा आदेश

  




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला : गैरवर्तनचा ठपका ठेऊन अकोला पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज लांडगे यांना निलंबित केल्याने अकोला पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.


मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांची जालना ते मुंबई संभाव्य पायदळ यात्रा आणि त्यानंतर आयोध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा या काळात 20 ते 28 जानेवारी पर्यंत सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या सुट्ट्या रद्द केल्या होत्या. या काळात अति महत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर राहणाऱ्या मनोज लांडगे यांच्यावर गैरवर्तवणूकिचा ठपका ठेवत शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबित काळात पोलीस नियंत्रण कक्ष अकोला येथे त्यांना दररोज दोन्ही वेळच्या गणनेत उपस्थित राहावे लागणार असल्याचे  आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश 31 JAN 2024 रोजी दिला आहे.




असा आहे निलंबन आदेश 


सपोनि, मनोज लांडगे, नेमणुक सि.एम.एस. सेल, अकोला येथे नेमणुकीस आहात. अंत्यत महत्वाचे ठिकाणी सि.एम.एस. सेल येथे नेमणुकीस असुन दिनांक ०५.०१.२०२४ अन्वये ०४ दिवस किरकोळ रजेवर रवाना झाले व दिनांक १०.०१.२०२४ रोजी कर्तव्यावर हजर होणे आवश्यक असतांना आपण मोबाईल व्दारे कळविले की, प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने वैदयकिय उपचार करण्याकरीता गेले असता डॉक्टरानी बेड रेस्टचा सल्ला दिला. व कोणतीही वैदयकिय औषधोपचाराची कागदपत्रे सादर न करता व वरिष्ठांना कोणतीही पूर्व सुचना न देता परस्पर किरकोळ रजेवरुन रुग्ण निवेदन केले. विशेष पोलीस महानिरीक्षक, (का.व.सु.), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र अन्वये कार्यालयीन आदेश अन्वये श्री मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई असा संभाव्य पायी यात्रा करणार असल्याने त्यांचे समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने २०.०१.२०२४ ते २८.०१.२०२४ पावेतो सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात आल्या असता, आपण अति महत्वाचे (रामप्रतिष्ठान अयोध्या) बंदोबस्तसाठी गैरहजर असल्याचे दिसून आलात. आपले गैरवर्तणुकीबद्दल निलंबित करण्याबाबत आवश्यक असल्याची खात्री झाल्याने आपले विरुध्द चौकशी सुरु करण्याचे अधीन राहुन, मुंबई पोलीस (शिक्षा आणि अपिले) नियम १९५६ मधील नियम ३ (१) (अ-२) अन्वये आदेश निर्गमित केल्याचे दिनांकापासुन आपणास शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित करण्यांत येत आहे.


असेही आदेश देण्यांत येत आहेत की, प्रस्तुत आदेश अस्तित्वात असे पर्यंतच्या कालावधीत सपोनि, मनोज लांडगे, नेमणुक सि.एम.एस. सेल, अकोला यांचे मुख्यालय हे नियंत्रण कक्ष हे राहील व पोलीस अधीक्षक, अकोला यांचे पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडून अन्यत्र कोठेही जाता येणार नाही. तसेच निलंबन कालावधीत त्यांनी पोनि, नियंत्रण कक्ष, अकोला यांचेकडे दररोज दोन्ही वेळेच्या गणणेत उपस्थिती दर्शवावी.


निलंबन कालावधीमध्ये सपोनि, मनोज लांडगे यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ६८ अन्वये दरमहा निर्वाहभत्ता देण्यात यावा. दर महिन्याला निर्वाह भत्ता घेण्यापुर्वी त्या महिन्यात त्यांनी कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय केलेला नाही, याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना सादर करावे लागेल.


निलंबन कालावधीमध्ये मनोज लांडगे यांना कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. आणि जर त्यांनी अशा प्रकारे नोकरी किंवा व्यवसाय केला तर त्यांची ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम १९७९ मधील नियम १६ अन्वये गैरवर्तणुक गणण्यात येईल, व त्यामुळे ते शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरतील. शिवाय त्यांना देय असलेला निर्वाह भत्ता ते गमावतील, असा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी दिला आहे.


विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र अमरावती यांच्याकडे तक्रार 



मनोज लांडगे यांच्या विरुद्ध यापूर्वी 8 जून 2023 रोजी विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र अमरावती यांच्या कडे  एक तक्रार दाखल झाली होती. एपीआय मनोज लांडगे हे एक वर्षापासून गैरकायदेशिररित्या गैरहजर असल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही व्हावी, अशी मागणी अर्जदार  गजानन कोगदे यांनी केली होती, हे येथे उल्लेखनीय आहे.






टिप्पण्या