Akola-crime-illegal-occupation: घरावर अवैध कब्जा करण्याचा आरोपींचा प्रयत्न: पोलिसांचे फिर्यादीस असहकार्य; मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्रीकडे फिर्यादीने केली न्यायाची मागणी




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: रतनलाल प्लॉट येथे असलेल्या मालमत्तेवर आपल्याला ताबा मिळावा यासाठी काही गैरकायद्याचे मंडळी द्वारे त्या घरावर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुंड प्रवृत्तीच्या या दहा ते पंधरा लोकांनी फिर्यादीस मारहाण करून जबरदस्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला. यासर्व प्रकारानंतर फिर्यादीने रामदास पेठ पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, फिर्यादीस ठाणेदारांनी असहकार्याची वागणूक दिली. त्यानंतर फिर्यादीने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून रितसर तक्रार अर्ज लिहून त्याच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवून न्यायाची मागणी केलेली आहे.


रामदासपेठ पोलीस ठाण्याचे हद्दीतील रतनलाल प्लॉट भागातील घरावर किरण संजय गोटूकले, संजय गोटूकले, उत्सव भिकूलाल गोयंका उर्फ उत्सव संजय गोटूकले व इतर 10 ते 15  अनोळखी गैरकायद्याची मंडळीनी अवैध कब्जा केल्याची फिर्याद देण्यासाठी फिर्यादी ठाण्यात गेले. यावेळी ठाणेदार यांनी “ मला विचारूनच ते कब्जा करायला गेले असून, त्याबाबत मी कोणतीही तक्रार किंवा कोणतीही चौकशी तसेच तपास याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासणी असे काहीही करणार नाही”, असे म्हंटले असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.


या प्रकारानंतर याबाबत फिर्यादीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे. तसेच तक्रार अर्जाच्या प्रती  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई, देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई, मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन मंत्रालय मुबंई,विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस महानिरीक्षक कार्यालय, अमरावती विभाग अमरावती यांच्याकडे पाठवून न्याय मागितला आहे.



फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार आणि तक्रार अर्ज नुसार, रतनलाल प्लॉट भागात मृतक कांतादेवी राजकुमार गोयंका कुटुंब फिर्यादी किरण ठाकरे यांना पुत्र मानीत होते, त्यामुळे कांतादेवी यांनी मृत्यूपूर्व वसीयतनामा तयार करताना त्यांच्या मालकीची सर्व संपत्तीची व्हिलेवाट लावण्यासाठी धर्मदाय संस्था तयार करून गोरक्षण, अनाथालय, वृद्धाश्रम, मंदिरे तयार करावी व संस्था चालवावी तसेच राहते घर हे फिर्यादीचे नावे करून दिले. या मृत्यूपत्राची रीतसर नोंदणी केली गेली. मात्र, रामदासपेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि आरोपी संजय गोटूकले, उत्सव भिकूलाल गोयंका उर्फ उत्सव संजय गोटूकले व इतर तसेच 10 ते 15 व्हिडीओ शूटिंगमध्ये दिसत असलेले अनोळखी गैर कायद्याची मंडळी संगनमताने एकत्रित येऊन, त्यांनी त्या घरावर अवैध कब्जा केला. फिर्यादीला मारहाण करून घरातील सामान लुटून नेले. याबाबत फिर्यादीने त्या अवैध कब्जा करणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी, यासाठी ठाण्यात जाऊन तक्रार दिली. मात्र, ठाणेदार यांनी फिर्यादीची तक्रार न घेता उलट ते कब्जा करण्यासाठी गेलेले लोक मला भेटून गेले असून त्याबाबतीत मी कुठलीही तक्रार घेणार नाही किंवा फिर्यादीच्या म्हणण्यानुसार तपास करणार नाही आणि त्या घटनेचा पुरावा म्हणून सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणार नाही, असे फिर्यादीला सांगिल्याने येथे न्याय मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने फिर्यादीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सामान्य नागरिकास न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी फिर्यादी यांनी केली आहे.



टिप्पण्या