Akola-city-RAF-route-march : अति संवेदनशिल भागात RAF शिघ्र कृती दलाचा रूट मार्च




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: अकोला शहराची अती संवेदनशिल म्हणुन ओळख आहे शहरातील नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण व्हावी, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा, आगामी सन उत्सव व सार्वत्रिक निवडणुका शांततेत व निर्भिड वातावरणात पार पाडावा तसेच RAF (शिघ्र कृती दल) B कंपनी १०७ बटालीयन यांना शहरातील संवेदनशिल व अतिसंवेदनशिल परिसराची माहिती व्हावी, याकरीता ०८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पोलीस अधीक्षक  अकोला यांचे मार्गदर्शनात पो.स्टे. अकोट फाईल व सिव्हील लाईन हददीत RAF (शिघ्र कृती दल) यांचा  रूटमार्च काढण्यात आला होता.




रूटमार्च  अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक , सतिश कुलकर्णी उप विभागीय पोलीस अधिकारी,  अमनकुमार सहा. कमांडन्ट RAF तसेच शहरातील सर्व पोलीस स्टेशन मधील ठाणे प्रभारी अधिकारी यांचेसह RCP प्लाटुन आणि QRT तसेच पो.स्टे. मधील अंमलदार असे एकुण २८ अधिकारी आणि २५० कर्मचारी सहभागी झाले होते.



अकोट फाईल रुटमार्च मार्ग  

दक्षिण मध्य रेल्वे परिसर, आपातापा चौक, पोस्टे समोरून भोला चौक, जगजिवनराम चौक, भिम चौक, रामदासमठ, साबरिया चौक, अब्दुल कलाम चौक, अकोट रोड मार्गे आपातापा चौक पर्यंत रुट मार्च काढण्यात आला.



पो.स्टे. सिव्हील लाईन रुटमार्च मार्ग 


कंवरनगर गॅस गोडावुन, गोकुळ कॉलनी, ट्युशन क्लासेस परिसर जवाहरनगर, राजे संभाजी पार्क, प्रभात किड्स ते शासकिय दुधडेअरी मागील भागात फिरून समाप्त करण्यात आला.


डायल ११२


नागरिकांना कधीही कुठेही पोलीसांची मदत लागल्यास डायल ११२ वर कॉल केल्यास त्यांना तात्काळ मदत पोहचविण्यात येते. पोलिसांची मदत लागल्यास नागरिकांनी 112 या हेल्प लाइन क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन अकोला पोलीस दल तर्फे कऱण्यात आले आहे.





१६ मोटर सायकलव्दारे  विशेष पेट्रोलिंग

पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अकोला शहर व जिल्हयात Visible Policing आणि Crime Prevention अनुषंगाने शहरात सकाळी ०६.०० ते ०९.०० या वेळेत गुड मॉर्निंग पेट्रोलिंग, फिक्स पॉईन्ट आणि सायंकाळी ०६.०० ते ११.०० यावेळेत जिल्हयातील सर्व पो.स्टे. परिसरामध्ये १६ मोटर सायकलव्दारे या विशेष पेट्रोलिंग ठेवले आहे.



टिप्पण्या