AIMIM-contest-in-Vidarbha : आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएम विदर्भातील चार जागांवर लढणार- खासदार इम्तियाज जलील



ठळक मुद्दे


*मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चन समाजाला लक्ष्य केले जात आहे 

* महाराष्ट्रात घाणेरडी राजनीति सुरू आहे.

*खासदार इम्तियाज जलील (छत्रपति संभाजी नगर) यांची अकोल्यात पत्रकार परिषद





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएम विदर्भातील चार जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी स्पष्ट सांगितले. 




अकोल्यातील शासकिय विश्रामगृह येथे रविवारी खासदार इम्तियाज जलील यांची पत्रकार परिषद झाली. एका विशाल जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी ते अकोल्यात पोहोचले असून, AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचीही सभा अकोल्यात जुने शहर भागात आयोजित केली आहे. यानिमित्त खासदार जलील अकोला शहरात आले होते. यावेळी त्यांनी  पक्षाची वतीने  पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.


जनहितार्थ जारी: प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, अकोला 



विदर्भ, मराठवाडा येथे पक्ष अधिक मजबूत करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे सांगून ते म्हणाले की, सध्या देशात एकतर तुरुंगात जा किंवा भाजपमध्ये जा असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे एमआयएमला काही फरक पडत नसला तरी एमआयएमला हलक्यात घेऊ नका, असेही ते म्हणाले. सत्ताधारी सरकारी यंत्रणांचा वापर करून देशाला घाबरवित आहेत. महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. सध्या घाणेरडी राजनीति महाराष्ट्रात सुरू आहे, अशी टीका जलील यांनी केली.


एमआयएम कोणत्याही पक्षासोबत गठबंधन करण्यास तयार आहे. मात्र तो पक्ष भाजपा पासून दूर असायला हवा. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत आमची युती झाली होती,असेही ते म्हणाले.


मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला हादरविले आहे. जरांगे यांचा प्रामाणिक हेतू आणि त्यांचा प्रामाणिक पणा यामुळेच त्यांच्या सोबत लाखो लोक आहेत. धनगर समाजात असा नेता नाही,असेही जलील म्हणाले.



देशातील सध्या जाती-धर्माच्या नावावर दरारा निर्माण केला जात आहे.  त्यावर मात करण्यासाठी एमआयएम निवडणुकीत मुद्दा बनवणार असून, तो संपवण्याचे प्राधान्यही एमआयएमचेच राहणार आहे. अशा प्रकारे देशातील महागाई आणि रोजगारावर कोणतीही चर्चा होत नसून, केवळ जनतेचे लक्ष  वेगवेगळ्या मुद्द्यांकडे वळविला जात आहेत. देशातील बहुतांश मुस्लिम, दलित आणि ख्रिश्चन समाजाला त्यांच्या धार्मिक भावनांसोबतच लक्ष्य केले जात आहे. एम आय एम शिक्षण आणि आरोग्य यावर प्राथमिकता देते. हैद्राबाद मध्ये एम आय एम ने जवळ्पास 17 हजार विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शाळा गणवेश, सकाळचा नाश्ता देते,हे उदाहरण आहे. आगामी काळात एम आय एम सर्वत्र असे चित्र उभे करणार आहे, असे  इम्तियाज जलील यांनी  सांगितले.




सत्ताधाऱ्यांकडून वक्फ बोर्डचे अस्तित्व संपविण्याचा डाव रचला जात आहे. वक्फ बोर्डच्या जमिनी बळकविल्या जात आहे. यामागे एकाच समाजाला लक्ष्य करण्याचा त्यांचा हेतू असल्याचा आरोप जलील यांनी केला. धर्माच्या नावावर राजकरण करणे हे देशाकरीता घातक आहे, असेही जलील यांनी सांगितले.


टिप्पण्या