abhishek-ghosalkar-murder case : शिवसेना (उबाठा) गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांची हत्या

Image courtesy:social media 




भारतीय अलंकार न्यूज 24

मुंबईः  शिवसेना (उबाठा) गटाचे नेते व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाइव्ह सुरू असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. तर हल्लेखोर मॉरीस नोहाना याने स्वतावर गोळी झाडून घेतली असल्याचे वृत्त समोर येत आहे.




अभिषेक घोसाळकर हे एका बैठकीसाठी दहिसर येथील एमएचबी, आयसी कॉलनीतील मॉरीस याच्या कार्यालयात आले होते. दोघामध्ये चर्चा झाल्यानंतर अचानक मॉरीसभाई याने रिवॉल्वर काढून एकुण पाच गोळ्या झाडल्या. तीन गोळ्या अभिषेक घोसाळकर यांना लागल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अभिषेक घोसाळकर यांना कार्यालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या शिवसैनिकांनी करुणा रुग्णालयात दाखल करण्यात केले. तर हल्लेखोर मॉरीसला शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. अभिषेक यांना उपचार दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने काही वेळानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले,असा घटनाक्रम समोर येत आहे.




अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकर हे दोनदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दहिसरमधील तरुण  नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं होत. अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती. घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर 7 चे नगरसेवक होते.



टिप्पण्या