two-fire-incidents-in-akola-city: अकोला शहरात आगीच्या दोन घटना; सुदैवाने मोठी हानी नाही




भारतीय अलंकार न्यूज 24

अकोला: रामदासपेठ पोलीस ठाण्यांतर्गत नदीकाठावर आणि मासूम शहा कब्रस्तानसमोर असलेल्या भंगार  दुकानाला आग लागली. ही घटना आज, 21 जानेवारी रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास उघडकीस आली. आग एवढी भीषण होती की आगीच्या ज्वाळा दुकानाबाहेर पोहोचल्या होत्या.  या आगीत दुकानात ठेवलेले सामान पूर्णपणे जळून खाक झाले.  ही आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही.  मात्र आगीने दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. बिलाल खान हुसेन खान असे दुकान मालकाचे नाव समोर आले आहे.




आगीच्या ज्वाळा दुकानाबाहेर पोहोचत असल्याने स्थानिक नागरिकांनी ती विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.  अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.  घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलीस ठाण्याचे  पोलीस कर्मचारी उपस्थित झाले.  घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते.



जनता भाजी बाजाराच्या कोपऱ्यावर आग 

दुसरी घटना काल रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास टॉवर चौक जवळील  जनता भाजी बाजाराच्या कोपऱ्यावर असलेल्या चप्पल दुकान समोर आग लागली होती. या दुकान समोरील नाल्यातून अचानक धूर येऊ लागला.  त्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली होती.  तसेच तात्काळ अग्निशमन विभागाच्या गाडीलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.  मात्र आग इतकी भीषण नव्हती, फक्त धूर निघत होता जो स्थानिक लोकांच्या मदतीने आटोक्यात आणण्यात आला.  नाल्यात पडलेल्या कोरड्या कचऱ्याला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे  समोरील चप्पल दुकान सुदैवाने बचावले. सिटी कोतवाली पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. 

टिप्पण्या