Spectator gallery collapses : नमो चषक स्पर्धा स्थळी प्रेक्षक गॅलरी कोसळली; शंभरहून अधिक जखमी; आयोजक, क्रीडा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बार्शीटाकळी येथे कबड्डी सामन्या दरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने घडला अपघात शंभर पेक्षा अधिक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


बार्शीटाकळी दगड पारवा येथे नमो चषक कबड्डी सामने सुरू असताना प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने मोठा अपघात घडला आहे. यामध्ये 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले असल्याची शक्यता आहे. यातील जखमींना बार्शीटाकळी, दगड पारवा तर काहींना अकोला येथे उपचारासाठी आणले आहे. जखमींची विचारपूस करण्यासाठी भाजपाचे जेष्ठ नेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीचे नेते प्राध्यापक तुकाराम बिडकर यांनी रुग्णालयात भेट दिली.






नमो चषक स्पर्धेतील एक सामना सुरू असताना बार्शीटाकळी तालुक्यातील दगड पारवा येथे स्टेडियम मधील गॅलरी पडल्यामुळे जखमींना तातडीने आमदार हरीश पिंपळे यांनी महायुतीची सभा सोडून त्यांना ताबडतोब खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करून त्यांची विचारपूस केली. ही दुर्दैवी घटना असून अधिक क्षमतेपेक्षा जास्त प्रेक्षक उपस्थित झाल्यामुळे घटना घडली आहे. भविष्यात अशी घटना घडणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे आमदार हरीश पिंपळे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत तातडीने महायुतीची सभा झाल्यावर भारतीय जनता पक्षाची विधानपरिषद नेते आमदार प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणवीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, विजय अग्रवाल आदी गेले. खासगी हॉस्पिटल मध्ये जखमींना उपचारसाठी भरती करण्यात आले आहे.




भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात नमो चषक सुरू असताना क्षमतेपेक्षा व जनतेच्या उत्साह मुळे किंवा कशामुळे घटना घडली याची पाहणी करण्यात येईल. दुर्दैवी घटनेची संदर्भात प्रवीण दरेकर यांनी संवेदना व्यक्त केल्या.  उपचाराचा संपूर्ण खर्च भारतीय जनता पक्ष व आमदार हरीश पिंपळे उचलणार आहे. घटनास्थळी जावून सुद्धा पाहणी केली आहे.






दगडपारवा येथील कबड्डी सामना दरम्यान बसण्याची गॅलरी कोसळून झालेल्या अपघातातील जखमींची विचारपूस करताना माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर सोबत डॉ अमोल रावणकर  व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष वसंता जाधव, प्रकाश माणिकराव, अनिल मालगे आदी.


दगडपारवा येथील घटने साठी आयोजकावर गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे



नमो चषक नावाने भाजप द्वारे शासकीय क्रीडा संकुल मध्ये जीवघेण्या नियोजन मुळे अनेक नागरिक गंभीर जख्मी झाले असून आयोजकांवर गुन्हे दाखल करून नागरिकाच्या उपचाराचा खर्च भाजप कडून वसूल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.


नमो चषकाचे नावे संपूर्ण राज्यात २८८ मतदार संघात भाजपने क्रीडा विभागाचा गैरवापर करीत राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार करायला क्रिडा संकुल मध्ये स्पर्धा आयोजित केल्या आहेत.ह्याच आयोजन अंतर्गत दगडपारवा येथे आमदार हरीश पिंपळे ह्यांचे हस्ते नमो चषक स्पर्धा सुरू झाली होती.ह्या साठी दगडपारवा येथे धोकादायक पद्धतीची प्रेक्षक गॅलरी तयार करण्यात आली होती.सदर गॅलरी कोसळून १५ नागरिक गंभीर जखमी झाले असून ५० पेक्षा अधिक नागरिकांना दुखापत झाली आहे.ह्या गचाळ आयोजन मुळे नागरिकांना नाहक जायबंदी व्हावे लागले असून ह्या प्रकरणी आयोजकांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि जखमीच्या उपचाराचा खर्च आणि नुकसान भरपाई भाजप कडून वसूल करण्यात यावी.तसेच इतर राजकीय पक्षाचे कार्यक्रम करायला अडवणूक करणारे आणि भाजप साठी शासकिय मैदान व इतर सुविधा उपलब्ध करून देणारे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट ह्यांची चौकशी करण्याची मागणी देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केली आहे.





टिप्पण्या