Shriram-temple-mahaprasad : श्रीराम भक्तांसाठी तयार होत आहे 251 किलोचा लाडू; डाबकी रोड परिसरातील ‘मुरली’ मध्ये लाडू बनवण्याच्या कार्याचा शुभारंभ




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा भारतभरातील प्रभू राम भक्तांमध्ये धार्मिक उत्साह वाढला आहे. अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील मुरली स्वीट मार्ट येथे आज शुक्रवारी श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था व स्वर्गीय अरुणभाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भगवान रामाला प्रसाद म्हणून 251 किलो वजनाचा 'लाडू' तयार करण्यास प्रारंभ करण्यात आला. हा लाडू उद्या सायंकाळ पर्यंत तयार होणार आहे. यानंतर सोमवार 22 जानेवारी रोजी या लाडवाचा प्रसाद राम भक्तांना वितरित करण्यात येणार आहे.


भक्ती, श्रद्धा, संस्कार व प्रत्येक मानवाचे कल्याण व्हावे, संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा, गो भक्ति गो संवर्धन सोबत चांगल्या संस्कारातून नवीन पिढी निर्माण व्हावी, या दृष्टीने प्रभू रामचंद्र यांच्या चरित्राचा प्रचार प्रसार व्हावा याकरिता श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था व स्वर्गीय अरुणभाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रमा सोबत श्रीराम ललाचा अयोध्या धाम येथे होणाऱ्या विशाल मंदिर निर्माण व प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर श्री राज राजेश्वर ग्रामदेवताची परवानगी घेऊन वेदपाठी ब्राह्मणाच्या मंत्रोच्चाराने 251 महानैवेद्य रामप्रसाद लाडू निर्माण करण्याची प्रक्रिया 14 पवित्र नद्यांच्या जलाने आणि राजस्थान इथून विशेष करून गो तुप वापरून लाडू बनवण्याचा कार्याचा शुभारंभ स्थानिक मुरली स्वीट डाबकी रोड येथे रामभक्तांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. 





याप्रसंगी अनिल मानधने, कविता मानधने, संजय जीरापुरे, मंगला सोनवणे, वैशाली निनोरे, निलेश निनोरे, सुनिता जोशी, गिरीश जोशी, शीला तिवारी, गिरीराज तिवारी, मर्फी चौधरी, हितेश चौधरी यांच्या शुभहस्ते पूजा अर्चना करण्यात आली. वेदपाठी ब्राह्मण पंडित रवी शर्मा, प्रमोद तिवारी, रमेश अडीचवाल, रमेश शर्मा, सौरभ  छांगाणी, संतोष शुक्ला यांनी वेदमंत्र उच्चारात विशेष पूजा अर्चना केली . यावेळी 14 पवित्र नद्यांचे जल पूजन करून प्रसाद अमृत होऊन प्रत्येकाच्या जीवनामध्ये समृद्धी व्हावी, अशी प्रार्थना करण्यात आली. अग्निपूजन करून शांडिल्य ऋषी यांना नमन करण्यात आले. यावेळी कारागीर संदीप यादगिरे मुंगालाल मीना यांनी पूजन केले. महाआरती होऊन प्रसाद वितरण करण्यात आला.





यावेळी सतीश ढगे, विकास वाणी, प्रवीण वाणी, विलास जोशी, विलास शेळके, शाम विंचनकर, रंजना विंचनकर, बबलू सावंत, विलास  निनोरे, इंगळे काका, ठाकूर काका, अनिल शाईवाले, गणपत चौधरी, रोहित तारकस, हेमंत राम चौधरी, बन्नाराम चौधरी, सोपीदेवी चौधरी, हरित चौधरी, जाणताराम चौधरी, जगदीश चौधरी, मनोज पालीवाल, आकाश तिवारी, राम ठाकूर, विशाल प्रशांत लोहिया, अशोक तोष्णीवाल, संभाजी चव्हाण, सुनील शर्मा, गौरव शर्मा, राजू भाटी, विशाल लड्डा, संजय अग्रवाल, सागर भारुका, विनायक शांडिल्य गुरुजी, विजय मानधने, प्रशांत लोहिया आदी राम भक्त उपस्थित होते.




सोमवार 22 जानेवारीला श्रीराम मंदिर कलाकृती सोबत बाल स्वरूप रामाचे दर्शन आणि 251 किलो महालाडूचे दर्शन मोठ्या राम मंदिर समोर होणार आहे. यासाठी राम दरबाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी श्री जानकी वल्लभो सरकारधर्मार्थ संस्था, स्वर्गीय अरुण भाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठान तसेच रामनगर मित्र मंडळ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून शहरात श्रीराममय वातावरण निर्माण करीत आहेत.

टिप्पण्या