republic-day-varkari-dindi-akl : प्रजासत्ताक दिनी हजारो वारकऱ्यांची पायदळ दिंडी शेगावी: श्री गजानन महाराज सेवा समिती शिवरचा उपक्रम; कारसेवक प्रमोद मोहरील यांचा पत्रकार परिषदेत सत्कार



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: श्री मारोती संस्थान संचालित गजानन महाराज सेवा समिती शिवर  द्वारा दरवर्षी प्रजासत्ताक दिनी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाच्या ओढीने शिवर ते शेगांव पायी दिंडीचे आयोजन केले जाते.  यावर्षी सुध्दा या पायी वारीचे आयोजन केले असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.


श्री मारोती संस्थान संचालित गजानन महाराज सेवा समिती शिवर यांनी शिवर येथे श्री संत गजानन महाराज मंदिराची बांधणी केली आहे. ज्याप्रमाणे शेगांव येथे भक्तांसाठी अन्न छत्र चालते त्याप्रमाणे शिवर येथील मंदिरात अन्न छत्र चालु करण्याचा प्रयत्न सेवा समिती करीत आहेत.  





शिवर येथे रहिवाशी मोठया प्रमाणावर औद्योगिक वसाहतीत काम करणारे कामगार आहेत. मात्र त्यांना सतत संत गजानन महाराज यांच्या दर्शनाची आस असते. मात्र त्यांना सुटी कमी असते आणि साप्ताहिक सुटी काहिनाच असते.  त्यामुळे ते एकत्रित येऊन दर्शन घेऊ शकत नाहीत. याचसाठी श्री मारोती संस्थान संचालित गजानन महाराज सेवा समिती शिवर यांनी देशाचा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हजारो वारकऱ्यांची पायी दिंडीचे आयोजनची परंपरा मागील वर्षी पासुन सूरू केली आहे. त्यानूसार यावर्षीही  शेगावी पायी दिंडीचे आयोजन केले असून, त्याची सर्व तयारी पुर्ण झाल्याचे आज पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 


मंदिर गाभाऱ्यातील संत गजानन महाराज यांची मनमोहक मूर्ती 



यामध्ये वारकऱ्यांची नोंदणी, वारी मार्गावरील चहापान , जेवण, विश्राम आणि परतीचा प्रवास सोबतच वारकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय पथक, रुग्णवाहिका व इतर आवश्यक त्या सेवांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळें शिवर ते शेगांव पायी दिंडी उपक्रम गजानन महाराज यांच्या आशीर्वादाने पुर्ण होईल, असा विश्वास आज पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. 


मंदिरात काढलेली आकर्षक रांगोळी 



यावेळी व्यवस्थापक अध्यक्ष अविनाश तुळशीराम वैराळे, मंदीर प्रमूख ह भ प  धनंजय महाराज मोरखडे, सेवासमिती अध्यक्ष आशिष चौखंडे, सेवा  समिती सचिव विश्वास पाटील लांजुळकर, सेवाधिकारी विरेंद्र झापर्डे, मंदीर प्रचार प्रमुख देवानंद मुरूमकर  आदींची प्रमुख उपस्थिती होती.


ठिकठिकाणी होणार स्वागत



सकाळी ६ वाजता शिवर येथून दिंडी निघेल. १००० वारकारी असतील.  यामध्ये  ६०० महिलांचा सहभाग राहील. दिंडी हायवे वरुन प्रारंभ होऊन महाकाली चौक, इनफ्रा मार्केट, नेहरू पार्क चौक ,सिव्हिल लाइन्स चौक येथुन मार्गक्रमन करेल. यावेळी आमदार नितीन देशमुख,शंकरराव इंगळे, डॉ अभय पाटील आदी मान्यवर स्वागत करतील. बस स्थानक, गांधी रोडवर हुशे  ज्वेलर्स जवळ करामत सेठ स्वागत करतील. सिटी कोतवाली, मोठया पुलावरून काळा मारोती रस्त्याने पालखी डाबकी रोड वर पोहचेल. याठिकाणी राजेश मिश्रा, डॉ.अशोक ओलंबे आदी स्वागत करतील. देशमुख मंगल कार्यालय येथे पालखी विश्राम करणार. याठिकाणी योगेश बुंदेले , मनोज पाटील आदी स्वागत करतील. येथून पुढे दिंडी  शेगावकडे  रवाना होईल.



कारसेवक प्रमोद मोहरील यांचा सत्कार 



पत्रकार परिषदेत संस्थेच्या वतीने कारसेवक ज्येष्ठ पत्रकार प्रमोद मोहरील यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मोहरील यांनी अयोध्या येथे त्यावेळी घडलेले अनुभव कथन केले. कार सेवकांना कारागृहात केलेली अमानुष मारहाण केल्याचा प्रसंग सांगितला. मात्र आज परत रामराज्य आल्या सारखे वाटते, अश्या शब्दात मोहरील यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

टिप्पण्या