political-maharashtra-mhayuti : जातीपातीचे राजकारण नव्या पिढीला नको आहे- प्रवीण दरेकर




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: राजकारणाची दिशा आज बदललेली आहे. राजकीय पक्षाने दिशा दिली नाही तर जनता आपल्या सोबत राहणार नाही. जातीपातीचे राजकारण नव्या पिढीला नको आहे. नव्या पिढीला विकास हवा आहे. आणि हा विकास देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी साधत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पर्यंत विकासाचे राजकारण कसे असते हे देशाला दाखवून दिले आहे,असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण नेते यांनी केलं.




डॉ बाबासाहेब आंबेडकर खुलेनाट्यगृह येथे आज रविवारी मकर संक्रांत पर्व निम्मित महायुती जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते.





लोकसभेच्या तयारीला सर्वच पक्ष कामाला लागले असून देशभरात पक्षाचं प्रचार प्रसार सुरू केलं आहे.या अनुषंगाने महाराष्ट्रातही सत्ताधारी पक्षातर्फे महायुती मेळावे सुरू केले आहेत. 




अकोल्यात ही महायुती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, या मेळाव्यात सत्तेत असलेले 15 पक्षांचे प्रतिनिधीसह प्रमुख वक्ते म्हणून भाजपचे नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. यावेळी प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांचे हात येणाऱ्या लोकसभेत मजबूत करण्याचे आवाहन उपस्थितीतांना केलं. यावेळी प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. तर केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि विकासात्मक कामांचा पाढा यावेळी वाचण्यात आला तर  आपसातील मतभेद विसरून एक होऊन काम करण्याचे आवाहन केलं.





महाआघाडी मध्ये तीन कॉलिटीचे तीन नेते एकत्र आलेले आहेत. मग महाआघाडीची खिचडी कशी शिजेल, असाही सवाल दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला. येणारा काळ हा आपला आहे त्यासाठी एकोपाने काम करणे आवश्यक आहे यासाठी जिल्हा पातळी जिल्हा तालुका गाव पातळीवर मेळाव्याचे आयोजन महायुती करीत असल्याचे दरेकर यांनी सांगितले. 



पक्ष हे देशासाठी, जनतेची सेवा आणि समाजाची सेवा करण्यासाठी असतात. आज आमच्याकडे सरकार आणि नेतृत्व दोन्ही आहे, त्यामुळे येत्या काळातही महायुतीचा देशाचा विकास साधू शकतो,अशी ग्वाही दरेकर यांनी दिली.






महाराष्ट्राचे खंबीर तीन नेतृत्व आज महाराष्ट्राला भरभरून देताहेत. येत्या काळातही महायुतीचेच सरकार असेल आणि महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य असेल,असा विश्वास यावेळी दरेकर यांनी व्यक्त केला.

मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशावर सुध्दा प्रवीण दरेकर यांनी वक्तव्य केले.मिलिंद देवरा हे शिंदे गटात गेले तरी ते आमच्या सोबतच असल्याचं ते म्हणाले, शिंदे गट काय आणि भाजप काय कुठं ही गेले तरी काही फरक पडत नाही त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाचा आनंदचं असल्याचं ते म्हणाले.



अमोल मिटकरींचा संजय राऊतांवर निशाणा 




आमदार अमोल मिटकरी यांनी प्रास्ताविकात शिवसेना नेते संजय राऊत (उबाठा गट) यांच्यावर टिका केली. उद्धव ठाकरे 16 जानेवारीला पत्रकार परिषद घेणार असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तर आमदार अपात्रतेचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या तर्फे लागल्याने संजय राऊत यांनी अस्वस्थ होऊ नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी दिला. तर संजय राऊत यांचे दहा पैकी तीन इंद्रिय खराब झाले असून त्यांनी त्यावर उपचार करावा, असा खोचक सल्लाही मिटकरी यांनी दिला. आगामी काही दिवसातच शरद पवार गटाचे काही मोठे नेते आणि आमदार अजित पवार गटात सामिल होणार असल्याचे संकेतही मिटकरी यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार तुकाराम बिडकर, शिवसेनेचे माजी आमदार गोपिकिसन बाजोरिया, विजय देशमुख, अश्विन नवले आदींनी मनोगत व्यक्त केले.




यावेळी आमदार रणधीर सावरकर, आमदार अमोल मिटकरी, आमदार प्रकाश भारसाकळे, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार तुकाराम बिडकर, कृष्णा अंधारे, अश्विन नवले, अनुप धोत्रे, विठ्ठल सरप ,विजय देशमुख, विजय अग्रवाल, जयंत मसने, सुनील अवचार, मनोज पाटील, सागर खंडारे, बळीराम शिरसकर, नागसेन शिरसागर, किशोर मांगते पाटील, अर्चना मसने, श्रीकांत पिंजरकर, कृष्णा शर्मा आदी मान्यवर व्यासपीठावर विराजमान होते.




कार्यक्रमाला गिरीश जोशी, रमेश अलकरी, संजय शिवरकर, देवाशिष काकड, संजय गोटफडे, फैयाज खान, उषा विरक, पवन महल्ले, योगेश अग्रवाल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला महायुतीचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.





टिप्पण्या