mock-drill-terrorists-attack: बीएसएनएल ऑफिस मधे तीन दहशतवादयांनी दोन लोकांना धरले ओलीस!



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: दहशतवाद विरोधी शाखा, अकोला कडुन दहशतवादी हल्ला झाल्यास प्रतिउत्तराकरीता करावयाची कारवाई व २६ जानेवारी तसेच नागरीक सुरक्षेच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता या दृष्टाने "मॉक ड्रिल"चे आयोजन मंगळवारी सायंकाळ केले होते. यामध्ये टेलीफोन एक्सचेन्ज (BSNL) ऑफिस मधील ट्रान्समिटर ऑफिस मधे तीन दहशतवादयांनी त्यांचे मागणीसाठी तेथील दोन लोकांना ओलीस धरले असल्याचा बनाव करण्यात आला होता.






अकोला जिल्हयात कोणत्याही ठिकाणी दहशतवादी हल्ला झाल्यास त्यास हल्ल्यास प्रतिउत्तर कसे दयायचे व नागरीकांना सदर हल्ल्यातुन सुरक्षित कसे बाहेर काढायचे व २६ जानेवारी तसेच नागरीकांना सुरक्षितता कशी प्रदान करता येईल. त्याच प्रमाणे दहशतवादी कृत्यांच्या घटनांबाबत जनमानसात जनजागृती निर्माण व्हावी,  याकरीता मॉकड्रिलचे आयोजन केले होते. 






पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच त्यांचे प्रत्यक्ष उपस्थितीत दहशतवाद विरोधी शाखा (ATB), अकोलाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे व त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार, बॉम्ब शोधक व नाशक पथक, अकोला येथील पोलीस अधिकारी पो.उप.नि. अविनाश मोहिते व त्यांचा स्टॉफ तसेच त्यांचा श्वान ब्राव्हो, दहशतवाद विरोधी पथक, अकोला येथील पोलीस अधिकारी व अंमलदार, पोलीस मुख्यालय, अकोला येथील RCP व QRT चे पथक, स्थानिक पोलीस स्टेशन सिव्हील लाईन, रामदास पेठ, सिटी कोतवाली, एमआयडिसी, जुने शहर, डाबकी रोड, येथील पोलीस अधिकारी व त्यांचे अंमलदार यांचे समन्वयाने १६ जानेवारी  रोजी सायंकाळी ५.१० वाजता पासुन ते ६.२० वाजे पावेतो पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अकोलाचे हददीतील अ वर्ग मर्मस्थळ " टेलीफोन एक्सचेन्ज (BSNL) ऑफिस मधील ट्रान्समिटर ऑफिस मधे तीन दहशतवादयांनी त्यांचे मागणीसाठी तेथील दोन लोकांना ओलीस धरले" असा बनाव करून मॉक ड्रिल (सराव अभ्यास ) चे आयोजन करण्यांत आले. 





दहशतवादयांनी ओलीस धरलेल्या लोकांची सुटका करून दहशतवादयांकडे असलेल्या स्फोटकांची BDDS पथकाजवळील उपकरण तसेच श्वान ब्राव्हो यांचे माध्यमातुन तपासणी करून दहशतवादयांना QRT व RCP चे कंमान्डोजचे माध्यमातुन ताब्यात घेवुन व नंतर पुढील कारवाईकामी त्यांना स्थानिक पोलीसांच्या ताब्यात दिले, असा सराव अभ्यास प्रभावीरित्या पार पाडला.



सदर मॉक ड्रिल यशस्वीरित्या व प्रभावीरित्या पार पाडण्यांकरीता पोलीस अधीक्षक  बच्चन सिंग, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगांवकर यांनी विशेष मार्गदर्शन केले.

टिप्पण्या