Home-guards-state-protest : होमगार्डला 365 दिवस काम द्यावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील होमगार्ड करणार परिवारासह आंदोलन





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: होमगार्डला प्रतिदिन 365 दिवस काम द्या, सेवा निवृत्तीचे वय 60 वर्ष करा , सेवा निवृत्ती नंतर अटल पेंशन योजना (अटल मानधन योजना) सर्वाना लागू करा, आदी मागण्यासाठी राज्यभरातील होमगार्ड येत्या 26 जानेवारी पासून सहकुटुंब आंदोलन प्रारंभ करणार आहेत. याबाबत काही नुकसान झाले तर त्याला शासन जबाबदार असतील, अशी चेतावणी युवा स्वाभिमान पार्टी जळगांव जिल्हा अध्यक्ष तथा  बहुजन टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी दिली.



शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत पाटिल यांनी आंदोलन बाबत सविस्तर माहिती दिली.


यावेळी ॲड. भूषण ठाकुर, सुनीता पवार, बेबी गावंडे, माधुरी दानापूरकर, पीयूष ढोरे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.





पोलिस, कर्मचारी, होमगार्ड यांना कामगार कायद्याप्रमाणे, किमान वेतन कायद्याप्रमाणे वेळेत कपात आणि पगारवाढ तात्काळ होणे, पोलिस कर्मचारी यांना इतर शासकीय विभागाप्रमाणे 5 दिवसाचा आठवडा करून तात्काळ सहकार्य  करा, इतर राज्य प्रमाणे महाराष्ट्रातही पोलिस संघटनेस तात्काळ परवानगी द्या, पोलिस,कर्मचारी, होमगार्ड यांच्या समस्या शासन दप्तरी मांडण्यासाठी एक राखीव (विधान परिषद ) जागा सोडणे,पोलिस महामंडळ स्थापन करा, होमगार्ड यांना कायमस्वरूपी तात्काळ करा ,सर्व पोलिस कर्मवारी यांना पेन्शन लागू करा तसेच इतर विविध मागण्या 24 जानेवारीपर्यत पूर्ण न झाल्यास जळगाव जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय समोर 26 जानेवारी संपूर्ण  परिवारसह आमरण उपोषण, धरणे आंदोलन करण्यात येईल. होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानास शासन जबाबदार राहणार.  शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक शासकीय कर्मचारी व निम शासकीय कर्मचारी यांना पोलिस दल वगळून इतर कर्मचा-यांसाठी फक्त 5 दिवसांचा आठवडा आहे. पोलीस वगळून इतर सर्वासाठी 24 शासकीय सुट्ट्या असतात. परंतु पोलीस मात्र या 52 + 24+ = 76 दिवस बारा पंधरा तास तर कधी 24 तास दररोज कर्तव्यावर असतो,  पोलिसांना 76 दिवसांचा पगार दिला पाहिजे, पोलिस, कर्मवारी, होमगार्ड यांना कामगार कायद्याप्रमाणे, किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार मिळाला पाहिजे. महसूल विभागलाही पोलिस कर्मचारी एवढेच कार्य असते. मात्र त्यांना 5 दिवसाचा आठवडा आहे. पगार ही जास्त आहे. मात्र पोलिस कर्मचारी यांना पगार कमी काम जास्त असे वेतन आहे. त्याच प्रमाणे सण,उत्सव निवडणूकमध्ये होमगार्ड यांना कामावर बोलवले जातात. मात्र इतर दिवस होमगार्ड यांना काम मिळत नाही. शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे,असा आरोप पाटील यांनी केला.




महाराष्ट्र राज्य धोरण नुसार एक लाख लोकसंख्येवर 180 ते 190 पोलिस कर्मचारी पाहीजे. पण सध्याच्या माहिती प्रमाणे 1 लाख लोकसंख्येवर 100 ते 120 पोलिस कर्मवारी आहेत, त्यामुळे 50 ते 60 पोलिसाचा अतिरिक्त भार यांच्या अंगावर आहे .पण पोलिसांची संघटना नसल्यामुळे व पोलिसांचा कोणी वाली नसत्यामुळे शासनामार्फत दखल घेतली जात नाही, पोलिस दलाची अवस्था अनाथा सारखी झाली आहे. पण राज्य घटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. पश्चीम बंगाल, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ इत्यादी राज्यांमध्ये पोलिसांची संघटना आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुध्दा पोलिसांची संघटना स्थापन करण्यास तात्काळ परवानगी मिळावी,त्याचप्रमाणे होमगार्ड यांना भारत सरकार आदेश तसेच केंद्र सरकारच्या उपसचिवांनी काढलेत्या  आदेशचे अमलबजावर्णी करून होमगार्डना 365 दिवस नियमित कण्यात यावे, अश्या मागण्या असल्याचे पाटील यांनी सांगितले.


या बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

टिप्पण्या