- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Hit-and-run-drivers-strike-akl: मध्यरात्रीपासून मोटार चालक सोडणार स्टिअरिंग; पत्रकार परिषदेत केले जाहीर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: देशाच्या विविध भागात दौरा करून आज 9 जानेवारी मध्यरात्रीपासून हिट अँड रन प्रकरणी आंदोलन अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्रमध्ये घेण्यात आला असून, महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन केले जाणार आहे. यामध्ये अकोला जिल्हयातील अकोला जिल्हा मोटार मालक वाहक चालक असोसिएशन अध्यक्ष जावेद खान पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होणार असल्याची माहिती स्वतः पठाण यांनी दिली आहे.
शासकिय विश्रामगृह येथे मंगळवारी आमंत्रित पत्रकार परिषदेत पठाण यांनी आंदोलन बाबत माहिती दिली.
देशभरामध्ये हिट अँड रन प्रकरणी आंदोलन सुरू आहे. सरकार मात्र भूमिकेवरती ठाम आहे. केंद्र सरकारने देशभरातील 25 करोड ड्रायव्हर चालकांचे संघटनांसोबत चर्चा करावी. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये.आजपासून आंदोलन अधिक आक्रमक करण्यात येतं असुन शांततेच्या तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवले जाणार आहे. कोणत्याही प्रकारची हिंसा व कुठेही रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा प्रकारचे वर्तन होणार नाही. शांततेच्या मार्गाने परंतु अधिक आक्रमक व तीव्र आंदोलन आज मंगळवार मध्यरात्री (9 जानेवारी ) पासुन चालक ड्रायव्हिंग स्टिअरिंग सोडणार आहेत. तसेच चक्काजाम देखील करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी जिल्हयातील चालक मालकांनी मोठया संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन अकोला जिल्हयातील सर्व चालक मालकांनी केले आहे.
यावेळी अकोला जिल्हा मोटार मालक वाहक असोसिएशन ,अध्यक्ष जावेद खान पठाण , शहर अध्यक्ष गुड्डू सेठ, अकोला ड्रायव्हर असोसिएशन अध्यक्ष सैयद वसीम, अब्दुल आरिफ, असिफ खान, इम्ब्रहीम खान, फिरोझ खान, सय्यद मोहसीन, युनूस खान, सनाउल्ला खान, निरंजन जमानिक, समाधान चव्हाण, संदीप गावंडे आदींची उपस्थिती होती.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा