historical-trade-exhibition-akl: अकोल्यात प्रथमच ऐतिहासिक' विदर्भ इंडस्ट्री अँड ट्रेड एक्सपो'; विविध उत्पादनाचे दीडशे पेक्षा अधिक स्टॉल सज्ज






भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीची "विटेक्स 2024" अर्थात विदर्भ इंडस्ट्री अँड ट्रेड एक्सपो ही तीन दिवसीय व्यापार व उद्योग प्रदर्शनी शुक्रवार 5 जानेवारी ते रविवार  7 जानेवारी पर्यंत गोरक्षण रोडप रिसरातील गोरक्षण संस्थानच्या मैदानात प्रारंभ होत असून, यात ख्यातनाम उद्योजक, व्यापारी व विविध उद्योग संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहतील. या तीन दिवसीय प्रदर्शनीत तब्बल एक लाख पर्यंत अकोलेकर नागरिक सहभागी होणार असल्याचा मनोदय विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांनी व्यक्त केला. 



चेंबरच्या सभागृहात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत या तीन दिवसीय प्रदर्शनीची माहिती देण्यात आली. 



यावेळी चेंबरचे राहुल गोयनका, सचिव निरव वोरा, कोषाध्यक्ष किशोर बालुका, सहसचिव व प्रदर्शनी संयोजक निखिल अग्रवाल, सहसंयोजक राहुल मित्तल आदी उपस्थित होते. 





पश्चिम विदर्भातील व्यापारी व उद्योजक वर्गासाठी उपयुक्त असणाऱ्या या प्रदर्शनीचे मुख्य प्रायोजक दि अकोला जनता कमर्शियल को ऑप बँक असून सहप्रायोजक भूपती डेव्हलपर्स असणार आहेत. शुक्रवार  5 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता या प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तथा आ रणधीर सावरकर, माजी ज्येष्ठ आ गोपीकिसन बाजोरिया, आ. वसंत खंडेलवाल, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतीया, नागपूर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी कोल्हापूर, केंमीटचे प्रातीय अध्यक्ष दीपक अग्रवाल, दि अकोला जनता बँकेचे अध्यक्ष व प्रदर्शनीचे मुख्य प्रायोजक असणाऱ्या जनता बँकेचे अध्यक्ष ज्ञानचंद गर्ग, कॅटचे राष्ट्रीय सचिव अशोक दालमिया, माजी महापौर विजय अग्रवाल, अकोला इंडस्ट्रीज असो.चे अध्यक्ष उन्मेश मालू, प्रदर्शनीचे सहप्रयोजक भूपती बिल्डरचे संचालक आनंद अग्रवाल, चेंबरचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल आदींच्या उपस्थितीत व चेंबरचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेत होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 



दीडशे पेक्षा जास्त स्टॉल या तीन दिवशीय प्रदर्शनीत सेवा देणार असून यामध्ये सोलर सिस्टिम, सर्व प्रकारचे फर्निचर विविध प्रकारचे गिफ्ट आर्टिकल, सर्व प्रकारच्या ग्रुहपयोगी साहित्य, डिझायनर कापड गारमेंट, शैक्षणिक, ऑटोमोबाईल, गृहनिर्माण, अकाउंटिंग, सॉफ्टवेअर, बैंकिंग, कृषी, दालमिल मशनरी आदी सर्व प्रकारच्या साहित्याचे विविध स्टॉल या प्रदर्शनीत आपली सेवा देणार आहेत. 



नागरिकांसाठी प्रदर्शनीत फेरफटका मारीत असताना विरंगुळा म्हणून विविध प्रकारच्या खमंग व्यंजनांचा फूड झोन ही आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. बदलत्या व्यापारी व उद्योग विश्वाची नवीन माहिती नागरिक, व्यापारी व उद्योजकांना व्हावी यासाठी विविध तांत्रिक परिसवाद प्रदर्शनीत राहणार आहेत. 5 जानेवरी रोजी सायंकाळी 5 वाजता प्रदर्शनीच्या दालनात एडवांटेज विदर्भ या विषयावर नागपूरचे तज्ञ गिरीधारीलाल मंत्री तसेच पश्चिम विदर्भात विकासाची संभावना या विषयावर प्रदीप माहेश्वरी यांचा परिसंवाद होणार आहे. यात प्रमुख पाहुणे म्हणून फेड ऑफ इंडस्ट्रीज ऑफ विदर्भचे अध्यक्ष मधुसूदन रुंगटा, चेंबरचे माजी अध्यक्ष रमाकांत खेतान उपस्थित राहणार आहेत.  



6 जाने रोजी सायंकाळी 5.30 वाजता एमएसएमई मध्ये सुवर्ण संधी या विषयावर धुळे येथील सीए जी बी मोदी व नागपूर येथील सीए जुलफेश शाह परिसंवाद सादर करणार आहेत. यात पाहुणे म्हणून चेंबरचे माजी अध्यक्ष बसंत बाछुका व उद्योजक शिवप्रकाश रुहाटीया उपस्थित राहणार आहेत. उद्योजक व व्यापारी समवेत नागरिकांच्या ज्ञान वृद्धीसाठी उपयुक्त असणाऱ्या या व्याख्यानांचाही सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 





नववर्षाच्या पर्वावर चेंबरच्या  इतिहासात प्रथमत होत असणाऱ्या या व्यापार, उद्योग प्रदर्शनीच्या सफलतेसाठी चेंबरची संपूर्ण कार्यकारणी व स्वागत समितीचे सदस्य रमाकांत खेतान, विक्रम गोइन्का श्रीकीसन अग्रवाल, अशोक दालमिया, अशोक गुप्ता, वसंत बाछुका, निरंजन अग्रवाल, कमलेश वोरा, रमाकांत खंडेलवाल, विजय पनपालिया, राजकुमार बिलाला, नितीन खंडेलवाल, स्टॉल नोंदणी समिती सदस्य सलीमभाई दोडिया, चंचल भाटी, सुधीर राठी, प्रणय कोठारी, नियोजन व कार्यकारी समिती सदस्य पंकज कोठारी, अनुराग अग्रवाल, नरेश अग्रवाल, सतीश बालचंदानी, राजकुमार राजपाल, सर्वेश अग्रवाल, संजय अग्रवाल, केतन गुप्ता, अमरीश पारेख, रितिक अग्रवाल, स्टॉल व्यवस्थापन व हाऊस किपिंग समिती सदस्य श्रीकांत गोयनका, रितेश गुप्ता, आशुतोष वर्मा, ओम अग्रवाल, स्टेज व्यवस्थापन व मोमेंटो समिती सदस्य निलेश बोर्डिवाल, मनोज अग्रवाल, संतोष छाजेड, पीयूष खण्डेलवाल, नितिन बियानी, सेमिनार समिति सदस्य किरीट मंत्री, बृजमोहन चितलांगे, पाहुणे व्यवस्थापन समिती सदस्य कृष्णा शर्मा, सिद्धार्थ रुहाटिया, नमन खंडेलवाल, उन्मेश मालू, माध्यम समिती सदस्य मनीष केडिया, शैलेंद्र कागलीवाल, शैलेश खरोटे, यश अग्रवाल, प्रतीक अग्रवाल, परवानगी समिती सदस्य ऍड सुभाषसिंह ठाकुर, ऍड धनंजय पाटील, सुरक्षा व निगा समिती सदस्य योगेश अग्रवाल, दिलीप खत्री, श्रीकर सोमण, ध्वनी, विद्युत व सीसीटीव्ही समिती सदस्य कमल खंडेलवाल, शैलेश अलीमचंदानी, प्रतुल भारूका, सांस्कृतिक समिती सदस्या रजनी महल्ले, दिपाली देशपांडे, जनसंपर्क समिती सदस्य दिनेश पाल्डीवाल, संतोष झुनझुनवाला, अविन अग्रवाल, नितीन भारूका, प्रमोद अग्रवाल, केटरिंग व फूड व्यवस्थापन समिती सदस्य प्रमोद खंडेलवाल, रोहित खंडेलवाल, सज्जन अग्रवाल आदी कामकाज करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टिप्पण्या