cyber crime: “हॅलो मी सैन्य दलातील अधिकारी बोलतोय” असा अनोळखी फोन कॉल आल्यास व्हा सावधान!




भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  “मी सैन्य दलातील अधिकारी बोलतोय”,  असा अनोळखी फोन नंबर वरून कॉल आल्यास नागरिकांनी सावधान राहा. अशा फोन कॉलला ब्लॉक करावे अथवा कोणताच प्रतिसाद देवू नये तसेच आपले बँक खातेची माहिती देवू नये. सायबर फसवणुकी पासुन सतर्क राहण्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांचे आवाहन केले आहे.



दिनांक १९/०१/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय अकोला येथे The Akola District Chemist and

Druggist Association यांचे कहुन तोतया सैन्य अधिकारी असल्याचे भासवुन फोन कॉल व हॉट्स ॲप द्वारे औषध व जनरल वस्तूंची मागणी करीत आहे. स्वतः ला सैन्य दलाचा अधिकारी सांगुन दबाव टाकुन दिलेल्या ऑर्डरचा माल पाठवा पेमेंट करतो, असे सांगुन केडीट कार्ड, डेबीट कार्ड व यु पी आय पेमेंट बद्दल गोपनिय माहिती विचारतो. काही सभासद दबावाला बळी पडून त्यांना गोपनिय माहिती देतात व त्यांचे सोबत सायबर फ्रॉड होवुन मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वळती करतात ते त्यांचे वेगवेगळे मोबाईल नंबर  ७८९६५४९११९, ८४७२९०२५९७,  ८०९९२५४०३६,  ९५१६३५६८९४,  ७५०११४६२५६, ७६३८०२६६१४,  ८८१७२८००५३, ८८७६२०९९८१,  ७७२५८१५३६०,  ८१३४९७४४५६ असे असुन, जनतेची आर्थिक फसवणूक करतात. असा आशयाचे निवेदन  पोलीस अधिक्षक अकोला यांना दिले होते. 



पोलीस अधिक्षक  बच्चन सिंह यांनी सदर निवेदनाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलीस निरिक्षक  शंकर शेळके यांना चौकशी करून तपास करण्याचे आदेश दिल्याने त्यांनी स्वतः जातीने लक्ष देवुन वरील सर्व मोबाईल नंबरचे अकोला सायबर येवुन तांत्रीक विश्लेषण केले असता, वरील सर्व नंबर हे बनवटी असुन त्यांचे लोकेशन हे राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश आदी ठिकाणचे जंगलातील असल्याचे विश्लेषणावरून निष्पन्न झाले आहे. सदर प्रकरणाची पडताळणी अर्जदार यांचे समक्ष करण्यात आली. 


तसेच एका व्यक्तीस शेतात सोने सापडले असुन कमी किंमतीत सोने देतो परंतु राजस्थान येथे यावे लागेल, असा फोन आला होता. व सोन्याचे फोटो देखील पाठविले होते. सदरचा मोबाईल नंबर सुध्दा फ्रौड होता,असे समोर आले.



वरील नंबर वरून आपल्या मोबाईल नंबर वर कॉल आल्यास त्याला प्रतिसाद न देला संबधीत मोबाईल नंबरला ब्लॉक करावे व कुठल्याही आकर्षक जाहिरातीला प्रलोभित होवुन बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



अशी करतात सायबर फसवणुक


• सैन्य दलातील अधिकारी असल्याचे भासवुन कॅटरिंग ऑर्डर देण्याचे सांगुन फसवणुक करतात.


* सैन्य दलातील अधिकारी असल्याचे भासवुन बदली झाल्याचे आहे असे सांगुन घरातील जुने सामान, कार, मोटर सायकल विकणे असल्याचे सांगुन अमिष दाखवुन बॅक डिटेल घेवुन फसवणुक करतात 


* ओळखीच्या लोकांचे सोशल मिडीया अफांऊट तयार करून पैसांची मागणी करतात.


* आम्हाला शेतात खोद काम करत असतांना गुप्तधन / सोने मिळालेले आहे तरी ते आम्ही तुम्हाला अर्ध्या किंमतीत देतो असे सांगुन फसवणूक करतात.


अश्या प्रकारे कोणी फोन कॉल किंवा व्हॉटस् अप द्वारे माहिती मागितल्यास कोणी आपले बैंक डिटेल, यु.पी.आय. डिटेल अथवा ओ.टी. पी. देवू नये, असे आवाहन अकोला पोलीस दलाकडुन करण्यात आले.

टिप्पण्या