ayodhya-ram-temple-diwali: अकोला शहरात साजरी झाली जणू दिवाळीच; श्रीराम भक्तांसाठी 331 किलोचा लाडू ठरले आकर्षण, अकोटात भजन दिंडी स्पर्धा





भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: गेल्या अनेक वर्षांच्या संघर्षानंतर भारतात प्रभू राम त्यांच्या मूळ स्थानी प्रेम आणि सन्मानाने विराजमान झाले आहेत. हीच भावना देशभरात असल्याने हा सोहळा दिवाळी म्हणून साजरा करण्यात आला. देशातील प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात राममय वातावरण निर्माण झाले होते.


सोमवारी अकोला शहरात प्रत्येक भागातून शोभायात्रा काढण्यात आल्या. चौका चौकात आणि मंदिरांमध्ये राम जीवनातील प्रसंगावर आधारित देखावे सादर करण्यात आले. देखावे बघण्यास नागरिकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले होते. घरोघरी पारंपारिक दिवे आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. भगवे ध्वज घरांवर उभारण्यात आले. रस्त्यांवर भगवा तोरण लावण्यात आले. बहुतांशी नागरीकानी केसरी, पिवळे वस्त्र परिधान केलेले होते. दिवसभर राम गीतांचे मधुर बोल कानी पडत होते. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी कऱण्यात आली.




दिव्य लाडू 


अयोध्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठपना पर्वावर आज देशभरात प्रभू राम भक्तांमध्ये धार्मिक उत्साह दिसून आला. अकोला शहरातील डाबकी रोड परिसरातील मुरली स्वीट  येथे  शुक्रवारपासून श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था व स्वर्गीय अरुणभाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भगवान रामाला प्रसाद म्हणून 331 किलो वजनाचा दिव्य लाडू तयार करण्यास प्रारंभ केला होता. आज सोमवार 22 जानेवारी रोजी या दिव्य लाडवाचा प्रसाद राम भक्तांना वितरित करण्यात आला. हा भव्य दिव्य लाडू भक्तांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता.



भक्ती, श्रद्धा, संस्कार व प्रत्येक मानवाचे कल्याण व्हावे, संस्कृतीचा प्रचार प्रसार व्हावा, गो भक्ति गो संवर्धन सोबत चांगल्या संस्कारातून नवीन पिढी निर्माण व्हावी, या दृष्टीने प्रभू रामचंद्र यांच्या चरित्राचा प्रचार प्रसार व्हावा याकरिता श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ संस्था व स्वर्गीय अरुणभाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रमा सोबत श्रीराम ललाचा अयोध्या धाम येथे होणाऱ्या विशाल मंदिर निर्माण व प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर श्री राज राजेश्वर ग्रामदेवताची परवानगी घेऊन वेदपाठी ब्राह्मणाच्या मंत्रोच्चाराने 351 महानैवेद्य रामप्रसाद लाडू निर्माण करण्याची प्रक्रिया 14 पवित्र नद्यांच्या जलाने आणि राजस्थान इथून विशेष करून गो तुप वापरून लाडू बनविण्यात आला. हा लाडू मुरली स्वीट डाबकी रोड येथे बनविण्यात आला. 



याप्रसंगी अनिल मानधने, कविता मानधने, संजय जीरापुरे, मंगला सोनवणे, वैशाली निनोरे, निलेश निनोरे, सुनिता जोशी, गिरीश जोशी, शीला तिवारी, गिरीराज तिवारी, मर्फी चौधरी, हितेश चौधरी, पंडित रवी शर्मा, प्रमोद तिवारी, रमेश अडीचवाल, रमेश शर्मा, सौरभ  छांगाणी, संतोष शुक्ला यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

बाळ राम मूर्तीची यावेळी मिरवणूक कढण्यात आली. आयोधा राम मंदिर संघर्ष गाथा नव्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी फलक लावून त्यावर माहिती देण्यात आली होती. या उत्सवात सतीश ढगे, विकास वाणी, प्रवीण वाणी, विलास जोशी, विलास शेळके, शाम विंचनकर, रंजना विंचनकर, बबलू सावंत, विलास  निनोरे, इंगळे काका, ठाकूर काका, अनिल शाईवाले, गणपत चौधरी, रोहित तारकस, हेमंत राम चौधरी, बन्नाराम चौधरी, सोपीदेवी चौधरी, हरित चौधरी, जाणताराम चौधरी, जगदीश चौधरी, मनोज पालीवाल, आकाश तिवारी, राम ठाकूर, विशाल प्रशांत लोहिया, अशोक तोष्णीवाल, संभाजी चव्हाण, सुनील शर्मा, गौरव शर्मा, राजू भाटी, विशाल लड्डा, संजय अग्रवाल, सागर भारुका, विनायक शांडिल्य गुरुजी, विजय मानधने, प्रशांत लोहिया आदी राम भक्त सहभागी झाले होते.


सोमवार 22 जानेवारीला श्रीराम मंदिर कलाकृती सोबत बाल स्वरूप रामाचे दर्शन आणि 331 किलो महालाडूचे दर्शन मोठ्या राम मंदिर समोर भक्तांना झाले. यासाठी राम दरबाराची व्यवस्था करण्यात आली. श्री जानकी वल्लभो सरकारधर्मार्थ संस्था, स्वर्गीय अरुण भाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठान तसेच रामनगर मित्र मंडळ वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून शहरात श्रीराममय वातावरण निर्माण केले.



321 दिवे 



श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था च्या वतीने व स्वर्गीय अरुण भाऊ जिरापुरे प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुसार रामजोत श्रीराम दरबारात श्रीराम मंदिर परिसरात 321 दिवे लावून श्रीराम, स्वस्तिक, श्री ओम दीपज्योत लावून प्रज्वलित करण्यात आली. गिरीराज तिवारी, शीला तिवारी, पवन तिवारी, लक्ष्मी तिवारी यांच्या शुभहस्ते पूजा अर्चना करण्यात आली. यावेळी जय श्री रामाचा नाम जप करण्यात आला व सर्वांच्या कल्याणाची कामना करण्यात आली. अनिल मानधने, गिरीश जोशी, हरी चौधरी, विष्णू चौधरी, हरित चौधरी, संजय जीरापुरे, संजय दिवनाले, गजानन धनुका, निलेश नीनोरे, संजय अग्रवाल, आदित्य शर्मा, अजय गुल्हाने, जितेंद्र चव्हाण, हरी जोशी, रिता जोशी, दिनेश जोशी, सुनिता जोशी, सुमन अग्रवाल, नीता अग्रवाल, रिता अग्रवाल, संतोष गोयंका, सतीश गोयंका आदि राम भक्त उपस्थित होते.


भाजपा तर्फे विविध कार्यक्रम


अकोला जिल्ह्यातील दहा लाख पेक्षा जास्त राम भक्त श्री राम भक्ती माय कार्यक्रमात सहभागी होऊन रामजोत  सुंदर कांड रामायण या कार्यक्रमात सहभागी झाले. एकतेचा प्रदर्शन करून भक्ती श्रद्धा संस्कार मानवतेचे कार्य रक्तदान आरोग्य शिबिर अन्नदानचे कार्यक्रम, परंपरागत कार्यक्रम करून सामाजिक दायित्व पूर्ण केल्याबद्दल प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी समस्त नागरिकांचे आभार मानले आहेत. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता विश्व हिंदू परिषद, विविध सामाजिक संघटनेने अकोला शहरात जवळपास 100 छोट्या मोठ्या मिरवणूक काढून भक्तिमय वातावरण मध्ये सहभागी झाले. आमदार सावरकर राजेश्वर मंदिरासह शहरातील 127 ठिकाणी भेटी देऊन राम भक्तांच्या कार्याला नमन केले. भारतीय जनता पक्षाचे हजारो कार्यकर्ते रामभक्त कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले. शहरातील विविध धार्मिक गणपती उत्सव मंडळ, सामाजिक संस्था, सुंदर कांड मंडळ, रामायण मंडळ, विविध धार्मिक संस्था विविध पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सहभागी होऊन रामललाचा जन्म उत्सव साजरा केला. आतिषबाजी सोबत विविध उपक्रम करून दिवाळी साजरी केली. रामनवमी घरोघरी गल्ली गल्ली मध्ये साजरी करून राम ज्योत घर आणि चौका चौकामध्ये लावून आपल्या परिसर दीपज्योतीने झगमगत केले. त्या भक्तीला आमदार सावरकर यांनी अभिनंदन केले, व नमन केले. विविध धार्मिक स्थळांना मंडळांना आमदार सावरकर यांनी भेट देऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.






रामभक्ति सोबत संस्काराचे काम श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या धामाचा कार्यक्रम अंतर्गत  पहिल्यांदा अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात श्री रामचरित्र वर देखाव्यासोबत प्रभू रामचंद्र, सीता, भरत, शत्रुघन, हनुमान यांची वेशभूषा सादरीकरणाचा कार्यक्रम हा मनाला प्रसन्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी सांगून संस्कारशील कार्यक्रमाबद्दल सर्व पाल्यांचे पालकांचे व धर्म नागरिकांचे त्यांनी अभिनंदन व आभार व्यक्त केले. राज्य रामराज्य आणि सुशासनची ही सुरुवात असल्याची त्यांनी सांगितले.


मंदिरात सजावट व देखावे 


सलासार बालाजी मंदिरात प्रभू राम लक्ष्मण सीता यांची भव्य आकर्षक मूर्ती देखावा आणि बाळ रामाचे पोस्टरने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. शिवर येथील संत गजानन महाराज मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले होते. गांधी रोड वरील छोटे राम मंदिर जवळ एलईडी स्क्रीनवर अयोध्या येथील प्राण प्रतिठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. आमदार वसंत खंडेलवाल यावेळी उपास्थित होते. टिळक मार्गांवरील मोठे राम मंदीर फुलांनी सजविले होते.



किन्नरांची उपस्थिति 


श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त अकोल्यातील मोठ्या राम मंदिरात गेल्या सात दिवसंपासून उत्सव साजरा होत आहे. आज राम नवमी शोभा यात्रा समितीच्यावतीने शहरातील मुख्य मार्गावरून श्रीरामाचा गजर करत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपस्थितीत विशेष उपस्थितीत लावली ती किन्नरांनी. श्रीरामाची गीत गात या किन्नरांनी राम धुनावर नृत्य केलं.



अकोट मध्ये भजन दिंडी स्पर्धा 



अकोला जिल्ह्यातील अकोट शहर आज जय श्रीरामाच्या गजरात न्हाऊन गेलं होतं. निमित्त होत अयोध्या येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा. अकोट येथील विशाल गणगणे मित्र परिवारा तर्फे आज भजन दिंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल, बासुरी आणि टाळच्या मंजुळ स्वराने शहरातील वातावरण भक्तिमय झालं होतं. या एकमेव स्पर्धेत अकोला - अमरावती जिल्ह्यातील 35 दिंडी वादक स्पर्धकांनी या अनोख्या स्पर्धेत सहभाग घेतला. शहरातील मुख्य मार्गावरून मार्गस्थ होणाऱ्या या दिंड्यासह अकोट ते अयोध्या करिता जाणाऱ्या रुपनाथ महाराजांच्या रथाचा देखील सहभाग होता. या दिंडी भजन स्पर्धा विजेत्याला प्रथम 33 हजार 333, द्वितीय 22 हजार 222, तर तृतीय पुरस्कार 11 हजार 111 देण्यात आलं.






टिप्पण्या