ayodhya-ram-temple-akola: सिटी कोतवाली चौकात साकारला दिव्य राम दरबार देखावा



भारतीय अलंकार न्यूज 24

ॲड. नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: स्व. आ.गोवर्धन शर्मा यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या विश्व हिन्दू परिषद - रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापना पर्वावर स्थानीय महाराणा प्रताप बाग परिसरातील राम दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दिव्य झाकीचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रारंभ करण्यात आला. 





ही विहंगम झाकी दिनांक 22 जानेवारी पर्यंत राम भक्तांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. राम दरबारा समवेत या विहंगम झाकीत धनुष्यबाण, गदा, कमळ फुल झाकी साकार करण्यात आली असून ही संगीतमय झाकी बघण्यासाठी महिला पुरुष राम भक्तांची गर्दी वाढायला लागली आहे. 





शनिवारी या झाकीचे वैदिक मंत्राचारात पूजन करण्यात आले.यावेळी आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल, माजी आ.बळीराम शिरस्कार, अशोक गुप्ता, कृष्णा शर्मा, अनुप धोत्रे, किशोर मांगटे पाटील, रामप्रकाश मिश्रा,विलास अनासाने, राजेंद्र गिरी, प्रतुल हातवळणे, शंकर खोवाल, संदीप वानखडे, अभिलाष फडके, अमोल आखरे, संतोष बुरडे, हरिभाऊ काळे, संजय गोटफोडे, माधव मानकर, प्रशांत अवचार,पवन पाडिया, विजय तोडसाम आदींच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. पूजाविधि पंडित हेमंत शर्मा यांनी पार पाडली. संचालन बाळकृष्ण बिडवई यांनी तर आभार नितीन जोशी यांनी मानलेत.





आज रामयज्ञ



रामललाच्या अयोध्या प्राणप्रतिष्ठा उत्सवाची जोरदार तयारी विहिप-रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने करण्यात आली असून, आज रविवार दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरात रामयज्ञ होम हवन करण्यात येणार असून संध्याकाळी 4 वाजता भजनकार राजेश शर्मा व हरीश उपाध्याय यांची भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. तसेच मुख्य सोहळ्याच्या पर्वावर सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता राम मंदिरात रामललांचे पादुका पूजन होऊन 2 क्विंटल बुंदीचा प्रसाद राम भक्तांना वितरित करण्यात येणार आहे. संध्याकाळी भव्य आतेषबाजी करण्यात येऊन रात्री 7 वाजता महाआरतीने या उत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे. या उत्सवात समस्त महिला पुरुष राम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रामनवमी शोभायात्रा समितीचे कृष्णा गोवर्धन शर्मा, राहुल राठी, वसंत बाछुका, गणेश काळकर, सुरज भगेवार, विलास अनासाने, डॉ अभय जैन, डॉ संजय सोनवणे, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, प्रकाश लोढीया, प्रा अनुप शर्मा, मनीष बाछुका, रमेश कोठारी, प्रकाश घोगलिया, संजय रोहनकार, नवीन गुप्ता, नितीन जोशी, अक्षय गंगाखेडकर,निलेश पाठक, बाळकृष्ण बिडवई, संदीप वाणी, हरीओम पांडे, अनिल थानवी, संजय दुबे, प्रताप विरवाणी, पंडित हेमंत शर्मा, पुष्पा वानखडे, मनीषा भुसारी, मालती रणपिसे, साधना देशमुख, रेखा नालट, कल्पना अडचूले, संतोषताई शर्मा समवेत विहिप-राम नवमी शोभायात्रा समितिच्या समस्त सेवाधारी वर्गाने केले.




टिप्पण्या