भारतीय अलंकार न्यूज 24
ॲड. नीलिमा शिंगणे जगड
अकोला: अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या बदलीचा आदेश नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी येवून धडकला आहे. घुगे यांच्या जागी बच्चन सिंह हे अकोला जिल्ह्याला नवे पोलीस अधीक्षक लाभले आहेत.
संदीप घुगे यांची बदली करण्यात आल्याचा आदेश गृहविभागाने काढला आहे. आता बच्चनसिंग हे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
बच्चन सिंह यांनी यापूर्वी वाशिमच्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती. गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी अकोल्याची कमान जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांच्याकडे सोपवण्याचे आदेश जारी केले आहेत.
श्री. संदीप घुगे, भा.पो.से. यांची "पोलीस अधीक्षक, अकोला" या पदावरुन, याद्वारे, बदली करण्यात येत असून त्यांच्या बदलीने पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील, असे आदेशात नमूद केले आहे.
अति संवेदनशील अशी ओळख असलेल्या अकोला जिल्ह्यात घुगे यांचा कार्यकाळ समाधानकारक राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी जुने शहर अकोला येथे उसळलेली दंगलीवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी घुगे यांनी परिस्थिती योग्य रितीने हाताळली होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा